नाशिक

''एसपीआय'' प्रवेश परीक्षेच्‍या अर्जाची २० फेब्रुवारीपर्यंत मुदत

CD
पान-३ ॲंकर ''एसपीआय'' प्रवेश परीक्षा अर्जाची २० फेब्रुवारीपर्यंत मुदत राज्‍यभरात ४ एप्रिलला आयोजन ः एनडीएमध्ये संधीसाठी महत्त्वाचा टप्पा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ः राज्‍य शासनातर्फे चालवल्या जाणाऱ्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत (एसपीआय) शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्‍या परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांना २० फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरता येईल. राज्‍यभरात ४ एप्रिलला परीक्षा होईल. सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्‍थेत प्रवेश मिळविणे महत्त्वाचे ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (एसपीआय) (मुले) यांच्या ५१ व्या तुकडीसाठी तसेच नाशिकच्‍या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (मुली) येथील पाचव्या तुकडीसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारी २०२७ पर्यंत आहे. ---- १६-१ विविध टप्‍यांत होणार परीक्षा ही प्रवेश प्रक्रिया लेखी परीक्षा, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी या टप्प्यांवर आधारित असेल. लेखी परीक्षा ४ एप्रिल २०२७ ला विविध परीक्षा केंद्रांवर इंग्रजी माध्यमातून घेतली जाईल. परीक्षेत एकूण ६०० गुणांचे १५० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ४ गुण मिळतील, तर चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. परीक्षेचा अभ्यासक्रम प्रामुख्याने नववी व दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. --- १६-१ अटी-शर्तींची पूर्तता आवश्‍यक उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थ्यांचा जन्म १ जुलै २०१० ते ०१ जुलै २०१३ या दरम्यान झालेला असावा. वर्ष २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी शिक्षण मंडळ परीक्षेला प्रविष्ठ आणि जून २०२७ मध्ये इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठी पात्र असणारा विद्यार्थी अर्ज भरु शकेल. मुलांसाठी किमान उंची १५७ सेंटीमीटर आणि छाती किमान ७४ सेंटीमीटर (५ सेंटीमीटर फुगवून) असावी. मुलींसाठी १५२ सेंटीमीटर उंची असावी. विद्यार्थ्यांना रातांधळेपणा किंवा रंगांधळेपणा नसावा. दृष्टी क्षमता यूपीएससीच्या एनडीए/आयएनए मानकांनुसार असावी. --- महत्त्वाच्‍या तारखांचा तपशील - अर्जाची शेवटची मुदत ः २० फेब्रुवारी २०२७ - प्रवेशपत्र उपलब्‍ध होण्याची तरीख- २० मार्च २०२७ नंतर ------ येथे करता येईल अर्ज- - मुलांसाठी (छत्रपती संभाजीनगर): www.spicsn.com - मुलींसाठी (नाशिक): www.girlspinashik.spicsn.com ---------- कोटः-- NSK26H34220 ''एनडीए''मध्ये प्रवेशोच्‍छूक विद्यार्थ्यांसाठी ''एसपीआय'' ही महत्त्वाची पायरी आहे. परीक्षेत गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषय महत्त्वाचे ठरतात. दिवसेंदिवस स्‍पर्धा वाढत असल्‍याने, योग्‍य मार्गदर्शनातूनच यश मिळविता येते. उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नाशिकला परीक्षा केंद्राची सुविधा उपलब्‍ध आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे. - हर्षल आहेरराव, संस्‍थापक, सुदर्शन एनडीए अकॅडमी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोप पेटलं! फ्रान्सनंतर आता जर्मनीतही ‘Gen Z' च्या आंदोलनाला हिंसक वळण; २७ पोलीस कर्मचारी जखमी, नेमकं काय घडतंय?

Mangalwedha Accident: कंटेनरच्या समोरासमोर धडकेत दोन्ही चालकाचा जागीच मृत्यू

Ghodegaon electricity issue: आठ दिवसांपासून वीज गायब; घोडेगावातील ३० हेक्टरवरील पिके करपली

IND vs NZ, T20I: पहिल्या ३ सामन्यांत लय सापडली, पण शेवटच्या २ मध्ये काय बिनसलं? श्रेयस अय्यर म्हणाला, 'एका गोष्टीत सुधारणा हवी...'

Bangladesh protests : बांगलादेशात पुन्हा असंतोषाचा उद्रेक! वेतनवाढीसाठी हजारो कामगार रस्त्यावर; ढाका-गाझीपूरमध्ये जाळपोळ

SCROLL FOR NEXT