नाशिक

जळगावात हाफ मॅरेथॉन स्‍पर्धा

CD
‘एसएसबीटी’तर्फे डिसेंबरमध्‍ये जळगावात हाफ मॅरेथॉन स्‍पर्धा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २९ : श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट संचलित एसएसबीटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सतर्फे संस्थेच्या प्रथम चेअरमन व भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्‍पर्धा २० डिसेंबरला जळगावात आयोजित केली असल्‍याची माहिती प्राचार्य डॉ. जी. के. पटनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पत्रपरिषदेला प्राचार्य डॉ. किरण पाटील, प्राचार्य डॉ. अमोल बाळुंगे, डॉ. कौशिक भट्टाचार्य, प्रा. वाय. के. चित्ते, एम. बी. रावलाणी आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असल्‍याने हाफ मॅरेथॉन स्पर्धा ‘जळगाव रन्स फॉर फार्मर्स’ या संकल्‍पनेवर होईल. स्पर्धेतून प्राप्त होणारा निधी मुख्यमंत्री दुष्काळ निवारण सहायता निधीस मदत म्हणून देण्यात येणार आहे. शहरातील खानदेश सेंट्रल मॉलच्या मैदानावर ही स्पर्धा २१ किमी, १० किमी, ५ किमी व ३ किमी अशा चार श्रेणींमध्ये होईल. स्‍पर्धेत सहभागींसाठी ३ किमीसाठी स्पर्धकास ३५० रुपये, ५ किमीसाठी ५०० रुपये, १० किमीसाठी ७०० रुपये तर २१ किमीसाठी ९०० रुपये शुल्क असेल. एसएसबीटी संस्थेच्या विद्यार्थ्यांना ५० टक्‍के सवलत असेल. यासाठी नोंदणीला सुरवात झाली आहे. खानदेश सेंट्रल येथून स्‍पर्धेला सुरवात होऊन २१ किमीची स्‍पर्धा सकाळी सहा, १० किमीची स्‍पर्धा सकाळी साडेसहाला तर ५ किमीची स्‍पर्धा सात व ३ किमीची स्‍पर्धा सकाळी साडेसातला सुरू होईल. चौकट विजेत्यांना आकर्षक बक्षिसे स्‍पर्धेतील २१ व १० किमी या दोन्ही श्रेणीमध्ये प्रथम विजेत्यास ११ हजार, द्वितीय साडेसात हजार व तृतीय विजेत्यास पाच हजार रुपये, मानपत्र, बोधचिन्ह दिले जाईल. महिला व पुरुष या दोघांसाठी पुरस्काराच्या वेगवेगळ्या श्रेणी असतील. तर सर्व स्पर्धकांसाठी दहा लकी ड्रॉद्वारे विजेते काढले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"BJP अन् काँग्रेसवाले मले हलक्यात घेते होते, आता विधानसभा लढवणार! पोट्ट्यांनी ठरवलं..."; कराळे मास्तरांचा थेट इशारा

Pune Roadwork: खोदकामामुळे जुन्या वृक्षांना धोका; पाषाण-सूस रस्त्यावरील स्थिती, कंत्राटदाराचा निष्काळजीपणा, मुळ्या पडल्या उघड्या

Pune News: मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पात निकृष्ट काम; ठेकेदाराचा खुलासा पुणे महापालिकेने फेटाळला

Latest Marathi News Update : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Madha Politics: माढ्याची खासदारकी राष्ट्रवादीला सोपी! पदवीधरच्या निकालाचा परिणाम; दोन आमदार पक्षासोबत तर दोन भाजपच्या जवळ

SCROLL FOR NEXT