Shraddha Jambukar with her family esakal
नाशिक

SSC Result Success: वडिलांना भाजी विक्रीत मदत करत 'ती'ने मिळवले 93.80 टक्के गुण; विद्यालयात प्रथमस्थानी

अजित देसाई

SSC Result Success : कोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली कुटुंब पुण्यातून वावी सारख्या ग्रामीण भागात स्थलांतरित झाले.

शाळेचे वातावरण बदलले मात्र या परिस्थितीला सामोरे जात वडिलांनी सुरू केलेल्या भाजीपाला विक्रीच्या दुकानावर मदत करत श्रद्धा जम्बुकर हिने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे 93. 80 टक्के गुण मिळवून ती विद्यालयात पहिली आली.

तर गणित या विषयात तिला 97 गुण मिळाले आहे. (SSC Result Success story of shraddha jambukar scored 94 percent while helping her father in selling vegetables nashik news)

आई, वडील व दोघी बहिणी असे चौकोनी जंबुकर कुटुंब. मूळचे संगमनेर येथील, मात्र भोसरी पुणे येथे वास्तव्याला होते. 2020 मध्ये संपूर्ण देशात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरीला असलेल्या ज्ञानदेव जंबुकर काम सोडावे लागले.

हाताला काम नसल्याने पुण्यात थांबून उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला. त्यात पुन्हा श्रद्धा व साक्षी या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची भविष्यातील परवड पाहता त्यांनी पुणे सोडण्याचा निर्णय घेतला. भोसरी येथील चांगल्या शाळेत सातवीला शिकणारी श्रद्धा व साक्षी सिन्नर तालुक्यातील वावी येथे कुटुबासोबत आजोळी राहायला आली.

वावीला आल्यानंतर ज्ञानदेव यांनी गावातच भाजीपाला विक्रीचा स्टॉल थाटला. श्रद्धा हिने आठवीला रयत शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयात प्रवेश घेतला. तर साक्षी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली.

कुटुंबाची विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी ज्ञानदेव यांच्या बरोबरीने त्यांची पत्नी मनीषा हीने देखील घरातच शिवणकाम सुरू केले. यथावकाश आठवडे बाजार सुरू झाले. तसा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय देखील जम धरू लागला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मंगळवारच्या वावी येथील आठवडे बाजारात श्रद्धा वडिलांना दुकान सांभाळायला मदत करू लागली. बरोबरीने शिक्षण देखील सुरू होते. नववीला गेल्यानंतर शाळा नियमित सुरू झाली. सुरुवातीपासूनच हुशार असलेल्या श्रद्धाला नववीला 93.86% गुण मिळाले.

दहावीच्या परीक्षेत त्यापेक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा तिचा आत्मविश्वास वाढला. या आत्मविश्वासाला बळ देण्याचे काम आईवडिलांनी, आजोबा आणि मामा- मामींनी केले. शाळा, शिकवणी वर्ग आणि अभ्यास सांभाळून घरातील जमेल ती कामे करतानाच वडिलांना देखील मदत करण्याचा परिपाठ श्रद्धाने सुरू ठेवला होता.

नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत तिने रात्रीचा दिवस करून अभ्यासावर मेहनत घेतली. तिच्या कष्टाचे फळही तिला मिळाले. दहावीला 93.80% गुण मिळवून ती शाळेत पहिली आली. हे यश प्रतिकूल परिस्थितीत आई-वडिलांनी दिलेल्या पाठबळावर मिळाल्याचे श्रद्धा सांगते.

आयटी इंजिनियर बनण्याचे स्वप्न....

गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांमध्ये सुरुवातीपासूनच प्राविण्य असलेल्या श्रद्धाचे आयटी इंजिनिअर बनवण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी बारावीपर्यंत न थांबता दहावीनंतरच डिप्लोमाला प्रवेश घेऊन 'माहिती तंत्रज्ञान' या विषयात डिग्री मिळवण्याचा तिचा मानस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT