lawns  Google
नाशिक

लॉन्स, मंगल कार्यालयांची घरपट्टी माफ; स्थायी समितीचा प्रस्ताव

विक्रांत मते

नाशिक : शहरातील लॉन्स व मंगल कार्यालयांना महापालिकेने बजावलेली घरपट्टी माफ करण्याचा स्थायी समितीने निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीचा सर्वश्री निर्णय प्रशासनावर सोपविण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाकाळात सर्वच व्यवसाय कमी-अधिक प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडल्याने भविष्यात त्यांच्याकडूनदेखील करमाफी मिळण्याची मागणी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून तूर्त कुठलाही निर्णय घेतला जाणार नसल्याचे समजते. (Standing Committee has decided to waive the lease imposed on the lawns and marriage Hall)

घरपट्टीच्या माध्यमातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. कोरोनामुळे वर्षापासून सातत्याने उत्पन्नात घट होत आहे. यावर्षी सवलत देवूनही पुरेसा महसूल मिळाले नाही. त्यात लॉन्स, मंगल कार्यालयाच्या मालकांनी स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे व शिवाजी गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान सभापती गणेश गिते यांची भेट घेऊन लॉन्स व मंगल कार्यालयांची घरपट्टी माफ करण्याची मागणी केली. त्यानुसार १ जून २०२१ रोजी स्थायी समितीने घरपट्टी माफीचा निर्णय घेत प्रशासनाकडे ठराव पाठविला आहे. स्थायी समितीच्या या निर्णयावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान झालेले अनेक व्यवसाय आहे. त्यांच्याकडूनदेखील करमाफीची मागणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थायी समितीचे सभापती गिते यांनी स्थायी समितीने करमाफीचा ठराव विविध कर विभागाकडे पाठविल्याचे म्हटले आहे. करमाफी द्यायची की नाही, याचा निर्णय संबंधित विभागाचे अधिकारी घेणार असल्याचे म्हटले आहे.

(Standing Committee has decided to waive the lease imposed on the lawns and marriage Hall)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

Ebola Case: काळजी वाढवणारी बातमी! काँगोहून आला अन् तब्येत बिघडली… अहमदाबादमध्ये इबोलाच्या संशयाने खळबळ, ४ जण आयसोलेट

‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत!

SCROLL FOR NEXT