nashik municipal corporation e-sakal
नाशिक

स्थायी समितीकडून अंदाजपत्रकात ४०० कोटींची वाढ

विक्रांत मते

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या स्थायी समितीच्या (standing committee) अंदाजपत्रकाला मुहूर्त लागला असून महासभेवर मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे.

नाशिक : कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या स्थायी समितीच्या (standing committee) अंदाजपत्रकाला मुहूर्त लागला असून महासभेवर मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. २७ मेस ऑनलाइन महासभेत अंदाजपत्रकाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने ४०० कोटींची वाढ केली आहे. प्रामुख्याने कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर तीन नवीन संसर्गजन्य रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्‍यात आला आहे. (standing committee increased the budget by Rs 400 crore nashik news)

२०२१- २२ या आर्थिक वर्षासाठी प्रशासनाने स्थायी समितीला २, ३६१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते, मात्र कोरोनामुळे शहराची परिस्थिती बिकट झाल्याने स्थायी समितीने अंदाजपत्रक महासभेला सादर केले नाही. कोरोनाची परिस्थिती आता सुरळीत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीने अंदाजपत्रक महासभेच्या मान्यतेसाठी पाठविले आहे. स्थायी समितीने विविध विकासकामांचा समावेश करत ४०० कोटी रुपयांची वाढ करून २७१९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महासभेच्या मान्यतेसाठी पाठविले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवकांना प्रभाग विकासासाठी ४० लाख रुपये निधी, दोनशे कोटी रुपयांचे नवीन रस्ते, पूल व सांडवे बांधण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद कायम ठेवली आहे. घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये स्थायी समितीने कुठलीही वाढ केली नाही.

तीन विभागांमध्ये ऑक्सिजन प्लांट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीने अंदाजपत्रकात शहरातील पंचवटी, सिडको व सातपूर या तीन विभागांमध्ये शंभर खाटांचे संसर्गजन्य आजाराचे रुग्णालय व त्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका शाळांमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना, सिंहस्थासाठी विशेष भूसंपादन, काझीगढीला संरक्षक भिंत बांधणे, महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांना संरक्षक भिंत बांधणे, जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जिम, क्रीडांगण विकसित करणे, या कामांवर भर देण्यात आला आहे.

उत्पन्नाबाबत प्रश्नचिन्ह

प्रशासनाच्या मूळ अंदाजपत्रकामध्ये स्थायी समितीने ४०० कोटी रुपयांची वाढ केली असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला इतके उत्पन्न मिळेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी तीनशे कोटींच्या पुढे गेली आहे. सवलतींचा वर्षाव करूनही वसुलीचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य होत नाही. युनिफाईड डीसीपीआरच्या माध्यमातून साडेचारशे कोटी रुपये प्राप्त होतील, असा अंदाज बांधला आहे. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण असल्याने प्रकरणे नगररचना विभागाकडे दाखल होतील का, हा देखील प्रश्न आहे.

यंदाच्या पंचवार्षिकमधील शेवटचे वर्ष असल्याने प्रभागाचा विकास करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नागरिकांवर कुठल्याही प्रकारची करवाढ लागली नाही.

-गणेश गिते, सभापती, स्थायी समिती.

(standing Committee increased the budget by Rs 400 crore nashik news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT