Start water supply scheme Otherwise will held pot morcha on Panchayat Samiti Nashik News esakal
नाशिक

पाणीपुरवठा योजना सुरू करा; अन्यथा पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढू

काळू राजोळे

वाडीवऱ्हे (जि. नाशिक) : दुगारवाडी (ता. त्र्यंबकेश्वर) येथील पिण्याच्या पाण्याच्या विहीर खोल करून नळ पाणीपुरवठा योजना सुरू करावी, या मागणीची पूर्तता केली नाही, तर बुधवारी (ता. १३) पंचायत समितीवर (Panchayat Samiti) हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान डोखे, सचिव तानाजी शिंदे यानी दिला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पंचायत समितीकडे मागणी केलेल्या टँकरचे प्रस्ताव मंजूर करावेत, हातपंप बसवावेत, कळमुस्ते ग्रामपंचायतपैकी दुगारवाडी येथे तत्काळ पाणीपुरवठा सुरू करावा, या मागण्यांचे निवेदन दिले होते. दुगारवाडी येथे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी मागील महिन्यात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी जाऊन पाहणीसाठी गेले होते. अहवाल तयार करून अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र अद्यापपर्यंत त्या वाडीला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही.

दुगारवाडीतील महिलांना ३ किलोमीटर अंतरावरील नदीपात्रांच्या मोठ्या खड्यात उतरून पाणी आणावे लागत आहे. अशी भयानक पाणीटंचाई असताना, पंचायत समितीकडून काहीही व्यवस्था केली जात नाही. दुगारवाडी, बाफनविहीर, शिवाची वाडी, खरवळ, भोकरवाडी व इतर पाड्यावर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांमध्ये टँकर सुरू करावे, या मागणीसाठी आम्ही श्रमजीवी संघटनेतर्फे त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल. जोपर्यंत संबंधित गावात टँकरने पाणी पोच होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT