पान एक ॲंकर
-------------------------
३४८७६
राज्य नाट्य स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ
यंदा २३ संघाचा समावेश; अंतिम फेरीसाठी दोन नाटके
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१२: शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६५ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला सोमवारपासून (ता.१६) प्रारंभ होत आहे. नाशिक केंद्राची प्राथमिक फेरी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होणार असून दररोज सायंकाळी सातला प्रेक्षकांना सदर नाटके पाहता येणार आहेत. आठ डिसेंबरपर्यंत स्पर्धा सुरू राहणार आहे.
----
प्रवेशिका घटल्या अन महिला दिग्दर्शिकाही
गेल्यावर्षी स्पर्धेत पाच महिला दिग्दर्शिकांचा सहभाग होता तर, यंदा तीच संख्या तीनवर आली आहे. आरती हिरे, आशा भोईर, पल्लवी पटवर्धन या तीन महिला दिग्दर्शकांचे नाटके यंदा स्पर्धेत असणार आहे. ६४ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत २५ तर, ६३ व्या राज्य नाट्य स्पर्धेला २६ प्रवेशिका आल्या होत्या. यंदा तेच प्रमाण २३ वर आल्याने नियमानुसार अंतिम फेरीसाठी दोन नाटकांची निवड केली जाणार आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक असे
सोमवार (ता.१६) : अनुभव मंटप (वीरशैव तरूण संघ)
मंगळवार (ता.१७) : पिवळी भिंत (विद्या सेवा संस्था)
बुधवार (ता.१८) : दाह (स्वयंसिध्दा ज्येष्ठ महिला नागरिक संस्था)
गुरूवार (ता.१९) : केअरटेकर (सुरंजन बहुद्देशीय संस्था)
शुक्रवार (ता.२०) : खेळ (नाट्य भारती, इंदौर)
शनिवार (ता.२१) : शेवंता जित्ती हाय (श्रीरंग अवधूत शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था)
रविवार (ता.२२) : मृत्यू आधीच आला होता (सरदार चौक मित्रमंडळ)
सोमवार (ता.२३) : सलवा जुडूम (नाट्यगोदा बहुद्देशीय संस्था)
मंगळवार (ता.२४) : एक धुरंदर तीन बिलंदर (सुंदर जीवन फाउंडेशन)
बुधवार (ता.२५) : कातळवेल (जिल्हा लेखा व कोषागारे कर्मचारी सहकारी पतसंस्था)
गुरूवार (ता.२६) : आमचा काळ मस्त होता (कलाहर्ष बहुद्देशीय संस्था, धुळे)
शुक्रवार (ता.२७) : कळी बंद पाऊस (लोकहितवादी मंडळ)
शनिवार (ता.२८) : एक्सपायरी डेट (मानवता बहुद्देशीय सिकास संस्था)
रविवार (ता.२९) : श्याम तुझी आऊस इली रे (इंद्रप्रभा सामाजिक शैक्षणिक विकास संस्था)
सोमवार (ता.३०) : द रेड पेन ड्राईव्ह (इच्छापूर्ती रिध्दी सिध्दी विनायक चॅरिटेबल ट्रस्ट)
---
मंगळवार (ता.१) : बाग बेंच आणि बरेच काही (एचएईडब्लूआरसी रंगशाखा, ओझर)
बुधवार (ता.२) : नेटवर्क प्रॉब्लेम (डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र)
गुरूवार (ता.३) : मेले कोण (सायक्लोन ग्रुप डान्स अकादमी चॅरिटेबल सोसायटी)
शुक्रवार (ता.४) : हमिदाबाईची कोठी (भडक दरवाजा बहुद्देशीय सेवाभावी संस्था)
शनिवार (ता.५) : रघुनाट्य @ ब्लॉगपोस्ट (बाबाज थिएटर्स)
रविवार (ता.६) : नथिंग टू से (अथर्व ड्रामाटिक्स अकादमी)
सोमवार (ता.७) : आता कोठे धावे मन (अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था)
मंगळवार (ता.८) : लेडीज सायकल (अभिरंग बाल कला संस्था)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.