Dengue- Esakal
नाशिक

NMC News: डेंगू संदर्भात राज्य शासनाने मागविला महापालिकेकडून अहवाल

सकाळ वृत्तसेवा

NMC News : ऑक्टोबरमध्ये डेंगी रुग्णांची संख्या घटत असली तरी राज्य शासनाने सप्टेंबरमधील उच्चांकी आकडेवारीवरून महापालिकेकडून अहवाल मागविला आहे.

त्याचबरोबर सणासुदीच्या पार्श्वभूमीवर व नांदेड येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर तयारीचा भाग म्हणून डेंगीची स्थिती व रक्तसाठा यासंदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (state government asked for report from NMC regarding dengue nashik)

जानेवारी ते जूनमध्ये डेंगी रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात डेंगी रुग्णांची संख्या शहरांमध्ये झपाट्याने वाढली. आतापर्यंत शहरांमध्ये ५३४ डेंगीबाधित रुग्णांचा आकडा पोचला आहे.

त्यामुळे राज्य शासनाने नाशिकमध्ये वाढत्या डेंगी रुग्णांच्या अनुषंगाने गंभीर दाखल घेतली आहे. जुलैपर्यंत शहरात डेंगीचे १४४ रुग्ण होते, ऑगस्टमध्ये ११७ रुग्ण आढळून आले. तर सप्टेंबरमध्ये डेंगी रुग्णांचा उच्चांक झाला.

सप्टेंबरमध्ये १ हजार ६६ डेंगी संशयित रुग्ण आढळून आले. त्यातील २६१ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात डेंगीचे बारा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.

त्यामुळे राज्य शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. दृकश्राव्य माध्यमातून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अधीक्षकांना विचारणा करण्यात आली. यात साथीच्या आजारांबाबत माहिती मागविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT