ram shinde 
नाशिक

"राज्य सरकार ‘आयसीयू’वर, निवडणुकांसाठी सज्ज राहा"

विक्रांत मते

नाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाला सत्तेचा कौल देऊनही जनतेचा विश्‍वासघात करून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. परंतु, राज्य सरकार ‘आयसीयू’वर असून, अल्पकालीन आहे. त्यामुळे निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन माजी मंत्री व भाजपचे उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केले. 

शिंदे म्हणाले, की विश्‍वासघाताने तयार झालेल्या महाविकास आघाडीला सडेतोड उत्तर देण्यासाठी पक्षाची बूथ रचना मजबूत करणे गरजेचे आहे. मजबूत बूथ, भाजप मजबूत या संकल्पनेच्या आधारावर कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. अनासपुरे यांनी बूथ संपर्क अभियान कार्यक्रमाचे स्वरूप सादर केले. ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत बूथ रचना व संपर्क अभियानाच्या बैठका घ्याव्यात, १४ ते २१ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत बूथ संपर्क अभियान उभे करून या अभियानात प्रदेशाकडून आलेल्या बूथ संपर्क अभियानासाठी नियोजित उपक्रम उद्दिष्टपूर्ततेकडे नेणे आदी बाबीवर त्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी कोविड काळात गरजूंना केलेल्या मदतकार्याचा अहवाल सादर केला. प्रारंभी पंडित दीनदयाळ उपाध्याय व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला. 

भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात ग्रामीण बूथ संपर्क अभियानासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर, जिल्हा संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, सरचिटणीस नंदकुमार खैरनार, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस शंकर वाघ, प्रदेश सांस्कृतिक आघाडी सहसंयोजक नुपूर सावजी, माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे, महिला उद्योग आघाडी प्रदेश सहसंयोजक सोनल दगडे, विशाल जाधव, उमेश घळसासी आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली! वैभव सूर्यवंशीसह ‘या’ खेळाडूंना Playing XI मध्ये संधी; पण पाकच्या कॅप्टनसोबत हात मिळवला का?

Miraj Incident : तीन मजली इमारतीवरून पडून दीड वर्षांचे बाळ गंभीर मिरज येथे मंगळवार पेठेतील घटना

Hidden Lakes in India: तलावाच्या काठावरचं हे जग पाहिलंय का? भारतातील ५ ठिकाणं पाहून थक्क व्हाल, लगेच कराल ट्रिप प्लॅन

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Bhopal Music Festival: माउथ ऑर्गनच्या सुरांचा 'कुंभमेळा', माउथ ऑर्गनच्या सुरांचा ‘कुंभ’; गांधी जयंतीला मोहन यादवांनी मांडली विकासाची रूपरेषा

SCROLL FOR NEXT