Police Sport Competition esakal
नाशिक

Police Sport Competition : नाशिकमध्ये राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा; रविवारपासून प्रारंभ

महाराष्ट्र पोलिस दलाच्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा नाशिकमध्ये होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Police Sport Competition : महाराष्ट्र पोलिस दलाच्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा नाशिकमध्ये होत आहेत. स्पर्धेला रविवार (ता. ४)पासून प्रारंभ होत असून, या स्पर्धेचे संयोजन नाशिक शहर पोलिस आयुक्तालय करीत आहे.

स्पर्धेत राज्यभरातील सुमारे साडेतीन हजार पोलिस खेळाडू सहभागी होत आहेत. ()

दोन वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भावामुळे पोलिस क्रीडा स्पर्धा होऊ शकलेल्या नाहीत. या वेळी स्पर्धांना प्रारंभ झाला असून, गेल्या डिसेंबरमध्ये विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धा परिक्षेत्रानिहाय पार पडल्या. त्यानंतर आता राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा होत आहेत. या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा नाशिकमध्ये होत आहेत.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिस आयुक्तालयातर्फे राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांसाठी राज्यभरातील पोलिस आयुक्तालय, पोलिस अधीक्षक कार्यालयांसह विविध विभागांचे सुमारे साडेतीन हजार पोलिस खेळाडू नाशिक शहरात दाखल होतील.

या स्पर्धा हिरावाडीतील (कै.) मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल, पोलिस कवायत मैदान यासह विविध मैदानांवर पार पडणार आहेत. तर, स्पर्धेचा समारोप १० फेब्रुवारीला होईल. स्पर्धेसाठी महाराष्ट्र पोलिस दलाच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह राज्यभरातील वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अशा होतील स्पर्धा

राज्य पोलिस स्पर्धांना ४ फेब्रुवारीला प्रारंभ

राज्यभरातून येणार ३५०० पोलिस खेळाडू

शहरातील विविध क्रीडा संकुलांमध्ये स्पर्धांचे आयोजन

१० फेब्रुवारीला स्पर्धेचा पारितोषिक वितरणाने समारोप

''पोलिस दलाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याचा सन्मान शहर पोलिस आयुक्तालयास मिळाला आहे. स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.''- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

Heritage sites: बाघ गुंफांच्या भित्तीचित्रांपासून गिन्नौरगडच्या किल्ल्यापर्यंत; चार स्थळांना UNESCOची दखल

Latest Marathi News Live Update : ST बँक कथित घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड; बड्या व्यक्तींवर कारवाईची शक्यता?

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT