टुडे १, मेन
-----
महापुरुषांचे पुतळे झाले उदंड, सुरक्षा मात्र वाऱ्यावर!
उपशीर्षक
दीड वर्षात दीडशेवर पुतळ्यांची उभारणी; काहींना अद्याप परवानगीची प्रतीक्षा
रईस शेख : सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : राष्ट्रपुरुष (किंवा महापुरुष) मानवी समाजाला, राष्ट्राला एका नव्या दिशेने घेऊन जाणारे मार्गदर्शक असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काही खास आणि अद्वितीय गुण असतात, याच गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले आहेत. या महापुरुषांच्या विचारांचा वारसा समाजाने पुढे न्यावा, या उद्देशालाच बगल देत, राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांची जणू स्पर्धाच निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात अधिकृतपणे दोन- चार नव्हे तब्बल १५८ पुतळे- स्मारकांची उभारणी जळगाव जिल्ह्यात झाली आहे. विनापरवानगी उभारलेल्या महापुरुषांचे पुतळे अद्याप परवानगीच्या प्रतीक्षेतच आहेत.
जगण्याचा हक्क, बोलण्या-लिहिण्याचा हक्क धर्माचरणाचा अधिकार बहाल करणारे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचा मुलमंत्र देणारे छत्रपती शिवाजी महाराज, साहस- स्वाभिमानाचा संदेश देणारे महाराणा प्रताप, अहिंसेचा मुलमंत्र देणारे महात्मा गाधी, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले, देव देवळात नसून तो माणसात मानणारे संत गाडगे महाराज, जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित नेहरू अशा कितीतरी महापुरुषांचे पुतळे आपल्या राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीकच म्हटले पाहिजेत. पण, आता याच थोर पुरुषांच्या पुतळे उभारण्यासाठी पुढाऱ्यांची स्पर्धा लागलीय.
१४-२
पुतळ्यांसाठी वाट्टेल ते,
पण देखभालीकडे दुर्लक्ष
गेल्या काही वर्षांत विविध राजकीय पक्ष, संघटना आणि स्थानिक नेत्यांकडून महापुरुषांच्या पुतळ्यांचा वापर स्वतःचे राजकीय वर्चस्व दाखविण्यासाठी केला जात असल्याचे सर्वश्रृत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या या पुतळ्यांच्या अनावरणासाठी मोठा गाजावाजा केला जातो. इतकंच काय तर, आमदार निधी, खासदारांच्या निधीचा वापर केला जातो. मात्र, उद्घाटनाचा सोहळा पार पडल्यानंतर अनेक ठिकाणी या पुतळ्यांची दुरवस्था होते. केवळ जयंती किंवा पुण्यतिथीच्या दिवशीच पुतळ्यांची साफसफाई आणि सुशोभीकरण केले जाते; उर्वरित दिवस मात्र या स्मारकांकडे दुर्लक्षच होते.
महापुरुषांचा खरा सन्मान हा त्यांच्या पुतळ्यांवर पुष्पहार अर्पण करण्यात नसून, त्यांनी दाखवलेल्या सत्याच्या व समतेच्या मार्गावर चालण्यात आहे. त्यामुळे केवळ पुतळे उभे करण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा महापुरुषांच्या नावाने सुसज्ज वाचनालये, अभ्यासिका, शाळा, डिजिटल लायब्ररी आणि सामाजिक उपक्रम सुरू करणे, हाच महापुरुषांचा खरा सन्मान ठरेल.
पुतळा-स्मारक समित्याच नाहीत
पुतळा, स्मारक उभारणीनंतर त्याची सुरक्षा, देखभाल आणि रखरखावसाठी कायद्याने स्मारक समित्यांची स्थापना करून त्या समितीमार्फत स्मारकांची देखभाल व सुरक्षा अपेक्षित असताना संपूर्ण जिल्हाभर स्मारक समित्या नुसत्याच कागदावर किंवा फलकावर दिसून येतात. वास्तविक पाहता कुठलेच काम त्यांच्यामार्फत करण्यात येत नसल्याचे गोपनिय विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
सीसीटीव्हीही नाहीत
पुतळ्यांची विटंबना होऊ नये, यासाठी संबंधितांकडूनच उच्च दर्जाचे नाइट व्हिजन कॅमेरे लावणे अपेक्षित आहे. असे असताना जिल्ह्यात बहुतांश स्मारक आणि पुतळ्यांना कोठेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नाही. ज्या ठिकाणी आहेत त्यांचा रखरखाव न केल्याने बहुतांश कॅमेरे बंदावस्थेत आहेत. तर, काहींचे डिव्हीआरच अस्तित्वात नाही.
--------
सुरक्षेचा ताण यंत्रणेवर
रात्रभरातून कुठल्या पुतळा, स्मारकांची विटंबना तर झाली नाही.. ना, यासाठी पोलिस दलात ‘गुड मॉर्निंग’ पथकाला जबाबदारी सोपवली गेली आहे. पहाटेच प्रत्येक पोलिस ठाण्याचे पथक आपापल्या हद्दित पुतळे स्मारकांची तपासणी करत हिंडते, त्यानंतर तशा नोंदी ठेवाव्या लागतात. पोलिस यंत्रणेवर याचा प्रचंड ताण पडतो. हेच मनुष्यबळ कायदा व सुव्यवस्था, गुन्ह्यांचा तपासात वापरता येऊ शकते.
-------
ग्राफमध्ये घ्यावे
अठरा महिने अन् पुतळे उदंड
वर्ष २०२५ : ४१
(एकट्या भडगाव तालुक्यात : २० पुतळे)
वर्ष २०२६ : १५८ (जून अखेर)
पाचोरा : ३१
पिंपळगाव हरेश्वर : २४
भडगाव : २५
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.