नाशिक

सायबर फसवणुकीपासून बचावासाठी सतर्कता आवश्यक : पोलीस निरीक्षक कैलास वाघ; देवळा महाविद्यालयात सायबर सुरक्षा विषयावर व्याख्यान

CD
सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन सकाळ वृत्तसेवा देवळा, ता. १३ : ऑनलाइन व्यवहार करताना ओटीपी कोणालाही सांगू नका. अनोळखी लिंक उघडू नका. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी केले. येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात उच्च व तंत्रशिक्षण विभाग, पुणे आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत सायबर सुरक्षेवर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सतीश ठाकरे होते. वाघ यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञान, अँड्रॉइड मोबाईलचा वाढता वापर आणि जागरूकतेचा अभाव यामुळे सायबर गुन्हे वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून खोटे संदेश, बनावट माहिती आणि फसवणुकीचे नवे प्रकार समोर येत आहेत. सुशिक्षित नागरिकही अशा फसवणुकीला बळी पडू शकतात. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. उपप्राचार्य डॉ. जयवंत भदाने उपस्थित होते. प्रा. यशवंत खैरनार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रा. चंद्रकांत दाणी यांनी आभार मानले. देवळा : सायबर सुरक्षा व्याख्यानात बोलताना पोलीस निरीक्षक कैलास वाघ, प्राचार्य डॉ.सतीश ठाकरे, प्रा.जयवंत भदाणे आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar : सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकरांना धक्का; उमेदवारी अर्ज अवैध, शक्तिप्रदर्शन करत दाखल केला होता अर्ज

Raju Shetti Protest : राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक बंद, हजारो शेतकरी दाखल

दिल्लीत सहकाऱ्यांना पुन्हा ताब्यात घेतलं, दीपके कच्च्या रस्त्याने पोहोचले शेतात; आंदोलनाबाबत फोनवरून चर्चा

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँक, पडळकरांचा अर्ज अवैध; भाजपला धक्का

Manoj Jarange: “जरांगेनीच माझ्यावर हल्ल्यासाठी सुपारी दिली”; अमोल खुणेंचा गंभीर आरोप, म्हणाले, “आता सुट्टी देणार नाही”

SCROLL FOR NEXT