child abuse esakal
नाशिक

मुकबधीर मुलाला अमानुषपणे चटके देणाऱ्या सावत्र आईला अटक

रामदास कदम

दिंडोरी/नाशिक : अवघ्या दहा वर्षांच्या सावत्र व मूकबधिर मुलाच्या अंगावर व गुप्तांगाला अमानुषपणे चटके दिल्याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संबंधित सावत्र आईस अटक केली आहे. (Stepmother-arrested-for-beat-child-nashik-marathi-news)

घटनेचे व्हिडिओ-फोटो समोर येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट

निळवंडी पाडे (ता. दिंडोरी) येथे हा प्रकार उघडकीस आला होता. पीडित मुलाचे वडील राजेंद्र आपसुंदे यांच्या तक्रारीवरून दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी सावत्र आई वर्षा आपसुंदे हीस अटक केली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की वर्षाचा मुलगाही मूकबधिर असून, त्याला या पीडित मुलाने खेळताना पलंगावरून ढकलून दिले होते. त्यामुळे हा आपल्या मुलास नेहमीच त्रास देतो, या रागातून त्याच्या गुप्तांगासह शरीरावर विविध ठिकाणी उलथणीचे चटके दिले. याबाबत ग्रामस्थांना माहिती कळताच त्यांनी त्यास तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक अनंत तारगे यांनी संबंधित महिलेवरुद्ध गुन्हा दाखल केला असून, महिलेस अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash Baramati : बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान कोसळलं

Maharashtra Teacher Promotion: शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; ‘टीईटी’ची अट कायम; ३१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

Independence Day 2026: ७९वा की ८०वा? यावर्षी भारत कितवा स्वातंत्र्यदिन साजरा करणार?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आण्णासाहेब डांगेंचा सत्कार सोहळा संपन्न

Mumbai: मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटवणार, निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार; महापालिकेची नवी उपाययोजना

SCROLL FOR NEXT