नाशिक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावे फसवणुक

CD
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावे फसवणूक पती-पत्नीकडून २० लाखांचा गंडा; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि दोन नामांकित कंपन्यांची बनावट कागदपत्रे व दस्तावेज दाखवून २० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदर्शनगर येथील मयूर संजय वानखेडे (वय २४) यांच्या तक्रारीनुसार नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत शहरातील शिवकॉलनी परिसरात संशयितांच्या घरी हा प्रकार घडला. संशयित ललिता देवेंद्र पाटील आणि देवेंद्र लक्ष्मण पाटील (दोन्ही रा. अंतुर्ली खुर्द, ता. एरंडोल, जि. जळगाव) यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल, असे सांगितले. तसेच आपण एका नामांकित कंपनीचे अधिकृत ब्रोकर असल्याचे सांगून, सुरुवातीला थोडाफार परतावा देऊन फिर्यादीचा विश्वास संपादित केला. त्यानंतर दोन्ही कंपन्यांचे बनावट दस्तावेज दाखवून फिर्यादीला जास्त रकमेची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. या दरम्यान संशयितांनी फिर्यादीच्या बँक खात्यावर व काही रक्कम रोख स्वरूपात घेऊन एकूण २० लाख रुपयांची फसवणूक केल्यावरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक उपनिरीक्षक संजय शेलार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

Sinhgad Institute : अखेर ‘सिंहगड संस्थे’च्या सात महाविद्यालयांवर ‘प्रशासक’; सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन शासनाच्या ताब्यात

ISC & ICSE Exam : ‘आयएससी’ची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर आयसीएसईची १५ फेब्रुवारीपासून; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण शक्य नाही; सतेज पाटलांची सडेतोड भूमिका

SCROLL FOR NEXT