Jailed esakal
नाशिक

Nashik Crime: शिवपुराण कथेत दागिने चोरणाऱ्या दोघी गजाआड; मराठवाडा, राजस्थानातील टोळ्यांचे कृत्य

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : पाथर्डी फाटा परिसरामध्ये गेल्या महिन्यात शिवमहापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असता, भाविकांचे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दोघींना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.

यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. धारदार कटरच्या मदतीने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या संशयिताकडून सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे. (story of Shivpuran two thieves who stole jewels Acts of gangs in Marathwada Rajasthan Nashik Crime)

२१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान पाच दिवस पंडित प्रदीप मिश्रा यांचा शिवमहापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पाच दिवसांमध्ये लाखो भाविकांनी हजेरी लावली होती.

परंतु याच काळात आलेल्या महिला भाविकांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारत संधी साधली होती. शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी १८ भाविकांचे २१ तोळे सोने चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लंपास केले होते.

तर, पाच दिवसांमध्ये सुमारे ३६ पेक्षा अधिक भाविक महिलांचे सुमारे १८ ते २० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित महिला या मराठवाडा व राजस्थानातील असल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार, पथकाने संशयित महिलांचा माग काढत मराठवाड्यातील जालना, परभणी गाठले आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका अल्पवयीन मुलीसह महिलेला अटक केली. दोघींच्या चौकशीतून सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे.

एक पथक राजस्थानात

प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक राजस्थानात ठाण मांडून आहे.

शिवमहापुराण कथा सोहळ्यात मराठवाड्यातील संशयित महिलांसह राजस्थानी पेहराव असलेल्या महिला व पुरुषांनी धारदार कटर व ब्लेडच्या सहाय्याने महिलांचे दागदागिने, पर्समधील किमती वस्तू चोरी केल्या आहेत. राजस्थानी टोळीला ताब्यात घेण्यासाठी नाशिक पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! प्रचार तोफा थंडावताच अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा, कारण काय?

Thane News: ठाणे पालिका निवडणूक यंत्रणा सज्ज! १६ लाख मतदार बजावणार हक्क; दिव्यांग मतदारांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय

Iran unrest : इराणमध्ये भयानक परिस्थिती! २००० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; सरकारनेही पहिल्यांदाच केलं मान्य

Vijay Hazare Trophy: विदर्भाची सेमीफायनलमध्ये धडक, इशांत शर्माच्या दिल्लीला हरवलं; उपांत्य फेरीत पोहचले 'हे' ४ संघ

Latest Marathi News Live Update : दोन भाऊ एकत्र आल्याचा फायदा होईल

SCROLL FOR NEXT