नाशिक

श्‍वान निर्बिजीकरण ठप्प

CD
धुळे टुडे २ साठी मेन... --- थकीत बिलामुळेच श्वान निर्बिजीकरणाचे काम ठप्प --- सुमारे एक कोटी रुपये बिल थकीत; मोकाट श्‍वानांच्या उपद्रवाच्या पुन्हा तक्रारी सुरू सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ६ : महापालिका हद्दीतील मोकाट श्‍वानांच्या निर्बिजीकरणाचे गेल्या महिनाभरापासून ठप्प आहे. श्वानांच्या निर्बिजीकरणाचे काम करणाऱ्या संस्थेचे सुमारे एक कोटी रुपये बिल मनपाकडे प्रलंबित आहे आणि काम बंद होण्याचे हेच प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मुद्द्यावर गांभिर्याने विचार करुन काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. महापालिका हद्दीत मोकाट श्वानांचा उपद्रव, दहशहतीमुळे संपूर्ण धुळेकर गेली अनेक वर्ष त्रस्त आहे. यातून मार्ग काढण्यासाठी श्वानांच्या निर्बिजीकरणाचा निर्णय घेण्यात आला. ५ जून २०२५ ला सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (कोल्हापूर) या संस्थेला हे काम देण्यात आले. तेंव्हापासून संस्था श्वान निर्बिजीकरणाचे काम करत आहे. दरम्यान, गेल्या साधारण महिनाभरापासून संस्थेने हे काम बंद केले आहे. त्यामुळे मोकाट श्वानांमुळे होणाऱ्या त्रासाच्या तक्रारी पुन्हा सुरु झाल्या आहेत. गुरुवारी (ता.५) झालेल्या महापालिकेच्या साप्ताहिक सभेतही सत्ताधारी नगरसेवक अमोल मासुळे यांनी मोकाट श्वानांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा मांडला. त्यावेळी निर्बिजीकरणाचे काम करणाऱ्या संस्थेचे सुमारे ९६ लाख रुपयांचे बिल प्रलंबित असल्याचा मुद्दाही समोर आला. याशिवाय इतरही काही कारणे सांगितली गेली. संस्थेला तीन वर्ष काम दिले असल्याचे म्हणत संस्थेवर कारवाईची मागणीही झाली. पण, ठेकेदारांची बिले प्रलंबित राहतात आणि त्यातून कामे बंद पडतात या कारणाकडेही गांभिर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. इतर विविध कारणे काम ठप्प पडण्यामागे दिली जात असली तरी सुमारे एक कोटी रुपये बिल प्रलंबित असल्यानेच समस्या निर्माण झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मुद्द्यावरही पदाधिकारी, प्रशासनाने गांभिर्याने लक्ष घालून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे दिसते. अन्यथा मोकाट श्वानांचा हा प्रश्न पुन्हा डोके वर काढल्याशिवाय राहणार नाही, हेही तेवढेच खरे. मनपाकडून नोटीस दरम्यान, मोकाट श्वानांच्या निर्बिजीकरणाचे काम करणाऱ्या सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या संस्थेला काम सुरु करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने नोटीसही बजावली आहे. आपल्या संस्थेला तीन वर्षांसाठी काम दिलेले आहे. त्यामुळे काम सुरु करावे अन्यथा कारवाई करु असा इशाराही नोटीशीतून देण्यात आला आहे. --- ...चौकट... आत्तापर्यंतचे काम असे ५ जून २०२५ ते महिनाभरापूर्वी काम बंद पडेपर्यंत संस्थेने एकूण १४ हजार ९०९ श्वानांचे निर्बिजीकरणाचे काम केले आहे. संस्थेला १६५० रुपये प्रती श्वान या दराने काम देण्यात आले आहे. संस्थेकडून आत्तापर्यंत साधारण २६ बिले सादर केली असून त्यातील १३ बिले संस्थेला अदा झाली आहेत. उर्वरीत १३ बिले मात्र प्रलंबित आहेत. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Visa Rules Major Change : भारतात राहण्यासाठी आता व्हिसा बंधनकारक! केंद्र सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; 'या' ६ समुदायांवर होणार थेट परिणाम

MBBS Admission: लाखो इच्छुक तरी एमबीबीएसच्या जागा रिक्त का? नीट उत्तीर्ण असूनही अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे का स्वप्न भंगले?

Vaibhav Chavan Case news: वैभव चव्हाणला जीवाची भीती होती? मृत्यूपूर्वीच्या दोन ऑडिओ क्लिप्समुळे खळबळ!

Latest Marathi News Update : 'गोकुळ' दूध संघात चार शासकीय सदस्य नियुक्त्यांच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही

Ahmednagar District Bank : विखे, कोल्हे की राजळे? अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राजकीय रस्सीखेच!

SCROLL FOR NEXT