नाशिक

नगाव ताणतणाव व्यवस्थापन

CD
KPD26B13516 नगाव : ताणतणाव व्यवस्थापनावर मार्गदर्शन करतांना साजिद पटेल. --------- नकारात्मक विचार सकारात्मक करा साजिद पटेल : गंगामाई महाविद्यालयात ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. १७ : मानवाचे जीवन धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे खूपच ताण येतो. यातून विद्यार्थीही सूटू शकत नाहीत. दैनंदिन जीवनातील ताण हा टाळता येत नाही, पण त्याचे व्यवस्थापन करता येते. नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी बदलले तर यश नक्कीच मिळते, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध माईंडसेट कोच साजिद पटेल यांनी दिला. नगाव (ता. धुळे) येथील गंगामाई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये मानसिक आरोग्य जनजागृती कार्यशाळेत पटेल मार्गदर्शन करीत होते. या वेळी प्राचार्य प्रा. सचिन चोरडिया व डॉ. एम. सी. महंथेश उपस्थित होते. पटेल यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवणे, भावनिक संतुलन राखणे आणि मानसिक आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे प्रभावी तंत्र सांगितले. त्यांनी एनएलपीच्या माध्यमातून मनावर नियंत्रण कसे मिळवावे आणि विचारांची दिशा कशी बदलायची याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले. प्राचार्य प्रा. चोरडीया म्हणाले, कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे, तर मानसिक स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. एम. सी. महंथेश यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

Pune News : झाडणकाम वाढले, रस्ते स्वच्छ, उकिरडे झाले कमी

SCROLL FOR NEXT