strike has been declared tomorrow against cement and steel 
नाशिक

सिमेंट, स्टील दरवाढीविरोधात उद्या संप; बांधकामे ठेवण्यात येणार बंद

विक्रांत मते

नाशिक : सिमेंट व स्टीलमध्ये होणारी अवाजवी दरवाढ रोखावी, सिमेंट, स्टील कंपन्यांवर रेग्युलेटरी ॲथॉरिटी सरकारने नेमावी, या मागणीसाठी बिल्डर्स व बांधकाम कॉन्ट्रॅक्टर्सतर्फे १२ फेब्रुवारीला देशव्यापी संप केला जाणार आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या देशपातळीवरील संस्थेने व इतर बांधकाम व्यावसायिक संघटनांनी संपाची घोषणा केली आहे. 

बांधकामे बंद ठेवण्यात येणार

बांधकामासाठी लागणाऱ्या स्टील व सिमेंटच्या दरात गेल्या तीन महिन्यांत सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बांधकामाच्या दरांमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याने सामान्यांना घरे परवडेनाशी झाली आहेत. सरकारी कामे व इन्फ्रास्ट्रक्चरची कामे यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे निषेध म्हणून नाशिक जिल्ह्यातील बांधकामे बंद ठेवण्यात येणार आहेत. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, नाशिक सेंटरतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष राहुल सूर्यवंशी व माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

Wardha : लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

SCROLL FOR NEXT