Shiv Sainiks gathered in Amardham on the occasion of agitation. esakal
नाशिक

बंडखोरांना जिवंतपणी दाखवले अमरधाम

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : शहरात शिवसेनेकडून (Shiv sena) करण्यात आलेल्या प्रतीकात्मक पुतळा दहन आंदोलनात (Agitation) बंडखोरांना जिवंतपणी अमरधामचा रस्ता दाखवीत शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला. असे आगळेवेगळे आंदोलन जुने नाशिक येथील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. (Strong discussion of symbolic movement in Nashik maharashtra political news)

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीविरोधात येथील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानिमित्ताने शहरातील शिवसैनिकांकडून शहरात आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक तिरड्यांवरील पुतळ्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. असे आगळेवेगळे आंदोलन अद्याप कुणाकडूनही करण्यात आले नाही. त्यामुळे हे आंदोलन जुन्या नाशिककरांसाठी चर्चेचा विषय ठरले. अमरधाममधील कर्मचाऱ्यांसाठीसुद्धा अशा प्रकारचा पहिलाच अनुभव होता. जुने नाशिक परिसरात दिवसभर या आंदोलनाची चर्चा सुरू होती. पोलिसांनी मात्र कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT