Strong sloganeering from Nashik Congress Protest against Prime Minister Narendra Modi's statement sakal
नाशिक

नाशिक काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी 'मोदी' यांच्या वक्तव्याचा निषेध

‘महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो’, ‘देशाची दिशाभूल करणारे मोदी सरकार हाय हाय’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो’, ‘देशाची दिशाभूल करणारे मोदी सरकार हाय हाय’ आदी घोषणांनी बुधवारी (ता. ९) जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय परिसर दणाणून गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. ७) लोकसभेत काँग्रेस विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटले. याविरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्र काँग्रेसने राज्यासह देशभरात कोरोना पसरविणाच्या गंभीर आरोपाबाबत प्रदेश काँग्रेसने राज्यभर निषेध करण्याची घोषणा मंगळवारी (ता. ८) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यानुसार काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन छेडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, मध्य ब्लॉकचे अध्यक्ष बबलू खैरे, नगरसेवक शाहू खैरे, महिला शाखेच्या शहराध्यक्ष नगरसेविका वत्सला खैरे, हनिफ बशीर, विजय राऊत, राजेंदर बागूल, लक्ष्ण जायभावे, नगरसेवक राहुल दिवे, समीर कांबळे, आशा तडवी, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, सिडको ब्लॉकचे विजय पाटील, अण्णा मोरे, लक्ष्मण धोत्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी केंद्र सरकारविरोधी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT