Death News esakal
नाशिक

Nashik News : कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विषारी औषध सेवन करून जीवन संपवल्याची घटना कामटवाडे भागात घडली.

कृष्णाली अनिल साबळे (१८, रा. लोटस आशीर्वाद पार्क, वृंदावननगर), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. (Student commits suicide due to low marks hsc result Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कृष्णाली साबळे ही एका महाविद्यालयात बारावी सायन्समध्ये शिक्षण घेत होती. गुरुवारी (ता. २५) दुपारी दोनला बारावीचा निकाल जाहीर झाला. निकालात कमी गुण मिळाल्याने कृष्णालीने राहत्या घरातच दुपारी विषारी औषध सेवन केले.

त्यामुळे तिची प्रकृती बिघडल्याचे घरच्यांच्या निदर्शनास आले. या वेळी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान रात्री दहाला तिचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कृष्णाली साबळे हिच्यामागे आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. याबाबत अंबड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, अधिक तपास अंबड पोलिस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT