नाशिक

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांची टायपिंग, स्टेनो परीक्षा फी माफ करा! नाशिक जिल्हा टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट असोसिएशनची परीक्षा परिषदेकडे मागणी

CD
विद्यार्थ्यांचे टंकलेखन परीक्षेचे शुल्क माफ करावे जिल्हा टाइपरायटिंग इन्स्टिट्यूट असोसिएशनची परीक्षा परिषदेकडे मागणी सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २९ : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ दिला जात असताना, शासकीय संगणक टंकलेखन (जीसीसी-टीबीसी) आणि लघुलेखन (स्टेनो) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही सवलत लागू करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा टाइपरायटिंग इन्स्टिट्यूट असोसिएशनने राज्य परीक्षा परिषदेकडे निवेदनाद्वारे केली. शासनाने मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा, त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड तालुक्यांसह राज्यातील ३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश केला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यात शासनाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर डिसेंबरमध्ये होणाऱ्या शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षेस प्रविष्ट तसेच दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना टंकलेखन आणि लघुलेखन परीक्षेच्या शुल्कातूनही सवलत मिळावी, अशी संघटनेची भूमिका आहे. त्यासाठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षार्थींनाही शुल्कमाफी द्यावी, यापूर्वी परीक्षा शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत करावे, पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या सवलतीचा लाभ मिळावा, असे संघटनेने म्हटले आहे. दुष्काळामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती अडचणीची असून, परिषदेने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. हे निवेदन परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करण्यात आले. निवेदनावर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नितीश डावरे, जिल्हा प्रतिनिधी सुरेश देवरे, उपाध्यक्ष सुहास भार्गवे, सचिव सचिन सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

Ranji Trophy 2026: मुंबईने ६४ चेंडूंत जिंकली मॅच!Tanush Kotian च्या ८ विकेट्स, तर Musheer Khan ची ऐतिहासिक कामगिरी

Latest Marathi News Update: आदिवासी महिलेचे चोरी झालेले मंगळसूत्र मिळाले

SCROLL FOR NEXT