Students of the Maharashtra team surrounded the officials and questioned them.  esakal
नाशिक

National Youth Festival : महाराष्ट्र संघाचे विद्यार्थी युवा महोत्सवाच्या स्पर्धेत नाहीत

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी विविध राज्यांचे संघ कला, क्रीडा सादरीकरणासाठी शहरात दाखल झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

National Youth Festival : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी विविध राज्यांचे संघ कला, क्रीडा सादरीकरणासाठी शहरात दाखल झाले आहेत. महाराष्ट्र संघातील तब्बल ६६ विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी नाही, तर केवळ सादरीकरणासाठी पात्र असल्याचे सांगितल्याने रविवारी (ता. १४) महाकवी कालिदास कलामंदिराच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहायला मिळाला.

महाराष्ट्र संघातील एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ ३९ विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक म्हणून ग्राह्य धरण्यात आले.(Students of Maharashtra team are not in competition of Yuva Mahotsav nashik news)

बाकी विद्यार्थ्यांना तुम्ही केवळ सादरीकरणासाठी पात्र आहात, हे सांगण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला. आम्ही केवळ सादरीकरणासाठी पात्र आहोत, तर आम्ही या ठिकाणी आलोच नसतो, अशी संतप्त भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

संतप्त विद्यार्थ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना घेराव घेत याबाबत जाब विचारला. मात्र अधिकारी समजूत काढण्यात असमर्थता दर्शवत निघून गेल्याने विद्यार्थी अधिक संतप्त झाल्याने महाकवी कालिदास कलामंदिराच्या प्रांगणात काहीकाळ गोंधळ उडाला होता.

विद्यार्थ्यांनी काढली नियोजनाची उणीदुणी

या संपूर्ण प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी महोत्सवाच्या सर्वच नियोजनाची उणीदुणी काढली. विद्यार्थ्यांच्या जेवणाकडे प्रशासन कानाडोळा करत असून, अत्यंत निकृष्ट दर्जाचे भोजन देत असल्याची तक्रार केली. शासनाकडून कोणताही निधी मिळाला नसून आतापर्यंतचा सर्व खर्च आमच्या खिशातून करावा लागत आहे.

तसेच विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी बसची व्यवस्था आहे. मात्र याद्वारे कार्यक्रम स्थळापासून २५ किलोमीटरवर राहण्याची सोय करून आमची आबाळ का केली जात आहे, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केला.

''शासनाने आम्हाला पैसे दिले नाहीत. आमचा संघ स्पर्धेतच नसेल, तर आम्ही खिशातला पैसा खर्च केला कोणासाठी, केवळ सादरीकरणासाठी इथे आम्हाला का बोलावलं, याची उत्तरं आम्हाला मिळायला हवीत.''- साक्षी कराड, बीड

''स्पर्धेच्या नावाने इथे यायला सांगितलं आणि सादरीकरणानंतर स्पर्धेत नाही सांगितलं. ही विद्यार्थांची स्पष्ट फसवणूक आहे.''- आदिती केंद्रे, नांदेड

''केंद्राचे नियम व सूचनांकडे दुर्लक्ष करत महाराष्ट्र शासनाने आमची फसवणूक केली आहे.''- रुद्र शर्मा, नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT