JEE mains exam
JEE mains exam esakal
नाशिक

JEE Main Exam : ‘जेईई मेन्‍स’मध्ये नाशिकचे विद्यार्थी चमकले

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी घेतलेल्‍या जेईई मेन्‍स २०२३ परीक्षेचा अंतिम निकाल शनिवारी (ता.२९) जाहीर झाला. या निकालात राष्ट्रीय क्रमवारीत नाशिकच्‍या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविताना जेईई ॲडव्हान्स्‍ड परीक्षेसाठी पात्रता मिळविली आहे. (students qualified for JEE Advanced examination with national rankings nashik news)

नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी यांच्‍यातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्‍या प्रवेशासाठी जानेवारी आणि एप्रिल अशी दोन सत्रांमध्ये जेईई मेन्‍स परीक्षा घेतली होती. यापूर्वीच जानेवारी सत्रातील परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता.

तर एप्रिलमधील परीक्षेसह अंतिम निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागून होती. अखेर शनिवारी एनटीएतर्फे निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना त्‍यांची वैयक्‍तिक माहिती दाखल करून संकेतस्‍थळावर उपलब्‍ध असलेल्‍या लिंकच्‍या माध्यमातून निकाल प्राप्त करण्याची सुविधा उपलब्‍ध करून दिलेली होती.

स्‍पेक्‍ट्रमचे विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

स्पेक्ट्रम येथील विद्यार्थी अभिराज घुमरे (९९.९२ पर्सेंटाईल), सानिका ब्राह्मणकर (९९.९०), अथर्व नारखेडे (९९.७७), परम पाबारी (९९.७६), पार्थ आहेर (९९.७६), प्रथमेश वाळिंबे (९९.७०), वेदांत घुगे (९९.५५), वैभव आव्‍हाड (९९.५२), इशान बुर्हाडे (९९.५१), विनीत हिरे (९९.४८) यांच्‍यासह सोनल वाघ, मुकुंद आहेर, अद्वैत थोसरे, जीत चावडा, दिनेश अन्‍सारी, भक्‍ती नाईक, अभिजित राठोड, श्रेयस चौधरी, सिद्धांत देवरे, यश बिन्नर, मनोमय पवार, संकेत शिंपी, अमन सुराणा यांनी यश मिळविले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नाशिक स्‍पेक्‍ट्रमच्‍या २४ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण मिळविले आहे. तर ५४ विद्यार्थ्यांनी ९८ पर्सेंटाईलहून अधिक गुण मिळविताना यश नोंदविले. वेदांत घुगे, हीतकुमार यांनी भौतिकशास्‍त्र विषयात शंभर पर्सेंटाईल मिळविले. विद्यार्थ्यांना शिक्षकासह संचालक कपिल जैन यांचे मार्गदर्शन मिळाले.

रेसोनन्सच्या अभिषेकची बाजी

रेसोनन्‍स येथील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. ७ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाईलहून अधिक गुण मिळविले. अभिषेक गुप्ताने (९९. ९८६ पर्सेंटाईल) मिळविताना राष्ट्रीय क्रमवारीत २५८ वा क्रमांक मिळविला आहे. आर्या जोशी (९९.९६३ पर्सेंटाईल) ही राष्ट्रीय क्रमवारीत ५३८ व्‍या क्रमांकावर आहे. कौशल मोराणकर (९९.९९३ पर्सेंटाईल) हिने १ हजार १०४,

शिवम शंकर (९९.९७५ पर्सेंटाईल) याने २ हजार ९१४ वा क्रमांक पटकावला आहे. ओजस पाठक (९९.७४६), विवेकानंद साहू (९९.२५२) आशिष मोरे (९९.१९७) यांनी यश मिळविले आहे. विद्यार्थ्यांना रेसोनन्सचे संचालक मनीष शंकर, स्वप्नील जैन, डॉ. नितीन पाठक, शिवाजी भोसले, साकेत राज आदींचे मार्गदर्शन लाभले.

अशोकाच्‍या आगम, नवीन, स्‍कंधची परीक्षेत बाजी

अशोका ग्रुप ऑफ स्कूल्सच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळविले आहे. आगम कासलीवाल (९९.९५ पर्सेंटाईल), नवीन कुमार (९९.९३), स्कंध कुंतागोड (९९.८७), स्वराज उपाध्याय (९९.४५), इशान मेहता (९९.४२), पर्णिका पवार (९८. ८४), इशिता मेहता (९८.३) आदींनी यश मिळविले आहे. आगमने शहरात दुसरा क्रमांक पटकावला.

स्कंधने भौतिकशास्‍त्र विषयात १०० पर्सेंटाईल गुण मिळवले. अशोकाच्या १४ विद्यार्थ्यांनी ९० पर्सेंटाईलहून अधिक गुण मिळविले आहेत. यशस्‍वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका रेणुका जोशी आदींनी केले आहे.

स्‍मार्ट एज्‍युकेशनच्‍या गौरांग, आर्यनचे यश

जुना गंगापूर नाका येथील स्‍मार्ट एज्‍युकेशन येथील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे. येथील गौरांग जोशी याने ९८.४ पर्सेंटाईल गुण मिळविले आहे. आर्यन पाटील (९५) तर प्राजक्‍ता शिंदे (९३.३) यांनीही यश मिळविले. विद्यार्थ्यांना संचालक प्रमोद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT