Students esakal
नाशिक

Nashik: विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा होणार आरोग्य तपासणी! आदिवासी विकास आयुक्तालयाचा शासनाकडे प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे वाढते मृत्यू लक्षात घेऊन राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयाने शासनाला सादर केला.

आदिवासी व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही आरोग्य तपासणी होईल. त्यामुळे राज्यभरातील ४९९ शासकीय शाळा व ५४१ अनुदानित आश्रमशाळांतील पाच लाख विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होऊन त्यांना तत्काळ आरोग्य सुविधा मिळणार आहेत. (Students will be examined twice year Proposal of Tribal Development Commissionerate to Govt Nashik)

राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे सर्पदंश, आजारपण, अपघात, पाण्यात बुडून, आकस्मिक व इतर अन्य कारणांनी मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते.

तसेच, आश्रमशाळा पथकांचे वैद्यकीय अधिकारीही कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त प्रत्येक उपकेंद्रात एक समुदाय अधिकारीही उपलब्ध आहे. मात्र, प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, आदिवासी भागातील रिक्त पदे, तसेच दुर्गम भागात या शाळा असल्याने या योजनेत अडचणी निर्माण होतात.

परिणामी, विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो. हे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्यभरातील सर्व आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिंनींची नियमित आरोग्य सुविधा मिळण्यासाठी त्यांची वर्षातून दोनदा तपासणी करावी.

सदर आरोग्य तपासणीबाबतचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या संदर्भात करण्यात आलेले प्रस्ताव शासनास सादर झाले असून, लवकरच त्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

"आश्रमशाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी वर्षातून दोनदा करण्यात यावी, असा प्रस्ताव सादर केला आहे. आरोग्य तपासणीचे वेळापत्रक, कोठे करावे, त्याचे सेवेचे नियोजन तसेच तपासणीबाबतचे रजिस्टर ठेवले जाईल."- नयना गुंडे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

योजनेची उद्दिष्टे

- मृत्यूचे प्रमाण कमी करणे

- आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे

- आजारी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय सेवा पुरविणे

- आपत्कालीन परिस्थितीत आश्रमशाळांत त्वरित उपचार उपलब्ध करून देणे

- विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक नोंदी असणारी आरोग्यपत्रिका तयार करणे

- विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक व्याख्याने घेणे

- आजारांबाबत ‘डॅशबोर्ड’ निर्माण करणे

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशी होणार आरोग्य तपासणी

नियमित तपासणीत केवळ आजारी मुलांची तपासणी होते. सामूहिक प्रश्न विचारले जातात. मात्र, या आरोग्य तपासणीत विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे डोक्यापासून पायापर्यंत, तसेच प्रत्येक अवयवाची तपासणी केली जाणार आहे.

यात किरकोळ आजार असल्यास शाळेतच उपचार दिले जातील. यात बालकास उपचाराने फरक न पडल्यास पुढील उपचारांसाठी प्राचार्यांना संदर्भीत करावे. शाळेत उपचार देणे शक्य नसल्यास अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करावी. यात कोणत्या रुग्णालयात उपचार करावेत, असे नमूद करावे.

योजनेचा लाभ मिळणारे विद्यार्थी

शासकीय आश्रमशाळा व विद्यार्थी

अप्पर आयुक्त कार्यालय, शासकीय शाळा, विद्यार्थी संख्या

नाशिक २१४ ९१,३७०

ठाणे १२७ ५५,८५२

अमरावती ८३ २९,१५६

नागपूर ७५ २१,४९४

अनुदानित आश्रमशाळा व विद्यार्थी

अप्पर आयुक्त शाळा विद्यार्थी संख्या

नाशिक विभाग २१ १,०९,४७९

ठाणे विभाग ७२ ३९,८६१

अमरावती विभाग १२० ४६,६१९

नागपूर विभाग १३८ ४४,९३५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: 19 व्या वर्षी साक्षी राहिंज इंडियन एअर फोर्समध्ये; पिंपरणेच्या लेकीची आकाशाला गवसणी, स्वप्न उतरवलं सत्यात!

Kolhapur 60 kg Silver Robbery : थरारक! आरामबसवर दरोडा, ६० किलो चांदी लुटली; कोल्हापुरातील घटना, बस थेट पोलिस ठाण्यात...

Land Acquisition : पुरंदर विमानतळासाठी नववर्षात भूसंपादन; जमीन परतावा, दर वाढवून देण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

BMC Election : देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर 'वंचित'ची नजर; '200 उमेदवार उतरवणार रिंगणात'; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा; मुंबईच्या राजकारणाला मिळणार नवे वळण

SCROLL FOR NEXT