नाशिक

सुभाष गांगुर्डे यांनी स्वखर्चाने बुजले रस्ते

CD
पान-२ ॲंकर ----------- PLS26B01943 पळसन (ता. सुरगाणा) ः वाढदिवसाच्या खर्चाला फाटा सामाजिक कार्यकर्ते सुभाष चौधरींनी यांच्यातर्फे स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजविणे सुरू असताना. ------------------ तब्बल अठरा किमी रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती ------------- सामाजिक कार्यकर्ते सुभाष चौधरींनी वाढदिवसाचा खर्च टाळून जनसेवेला दिले प्राधान्य, अभिनंदनाचा वर्षाव ------------- सकाळ वृत्तसेवा सुरगाणा, ता.४ ः ​वाढदिवस म्हटला, की फ्लेक्स, बॅनर, डिजेचा गजर आणि अफाट उधळपट्टी हे चित्र पाहायला मिळते. मात्र, भवाडा (ता. सुरगाणा) गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य व तालुका सचिव सुभाष रामू चौधरी यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला पूर्णपणे फाटा देत सुरगाणा ते पळशेत या तब्बल १८ किलोमीटरच्या रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने आणि स्वतः श्रमदान करून बुजविले. त्यांच्या या अनोख्या व प्रेरणादायी उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून जोरदार कौतुक होत आहे. ----------------- खड्ड्यांमुळे या मार्गावर सतत होणारे अपघात रोखण्यासाठी त्यांनी राबविलेल्या उपक्रमाबद्दल पळसण परिसरातील जनतेकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुरगाणा ते पळशेत आणि जामुनमाथा ते पळशेत हा १८ किलोमीटरचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला होता. या मार्गावरून दररोज पळसण व परिसरातील हजारो शालेय विद्यार्थी अळंगुण, सुरगाणा, नाशिक तसेच राज्यभरातील विविध ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी ये-जा करतात. परिसरातील गोरगरीब व आदिवासी बांधवांना उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयात जाण्यासाठी हा एकमेव मुख्य रस्ता आहे. मात्र, खड्ड्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात घडून प्रवाशांचे हाल होत होते. ​​प्रशासकीय उदासिनतेमुळे नागरिकांना सोसावा लागणारा त्रास आणि या रस्त्यामुळे होणाऱ्या अपघातांची गांभीर्याने दखल घेत, माजी आमदार कर्मयोगी जे. पी. गावित यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुभाष चौधरी यांनी वाढदिवसाच्या खर्चातून हा प्रश्न सोडवण्याचा संकल्प केला. ​त्यांनी स्वतःचे आणि मित्रपरिवारातील जेसीबी व ट्रॅक्टर ही यंत्रसामग्री एकत्र केली. ''सुभाष चौधरी मित्रपरिवार'' आणि सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून जामुनमाथा ते पळशेत या पूर्ण अठरा किलोमीटरच्या अंतरावर मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. ​या सामाजिक उपक्रमात सुभाष चौधरी यांच्यासोबत वसंत बागूल, येतू भोये, भरत पवार, चंदर पवार, भाऊराव धूम, चिंतामण पवार, कृष्णा भोये, मनोहर जाधव, भाऊराव पवार, चिंतामण गवळी, अशोक धूम, महेश धूम, सुरेश गावित, हंसराज धूम, मनोहर गवळी, किरण पवार, हेमंत चौधरी, लिलाधर चौधरी तसेच जेसीबी चालक कैलास महाले आदींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून खड्डे बुजविले. १६-१​ चौकट चौधरींचा उपक्रम अनुकरणीय राजकारणात आणि अडचणीच्या काळात सदैव गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेते अशी ओळख असलेल्या सुभाष चौधरी यांनी राबवलेल्या या नवीन उपक्रमामुळे परिसरातील प्रवाशांना, विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील जनतेने आणि प्रवाशांनी चौधरी व त्यांच्या मित्रपरिवाराचे मनापासून आभार मानले आहेत. ------------------

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT