Maharashtra Police
Maharashtra Police  esakal
नाशिक

Nashik News : चोरीला गेलेले वैद्यकीय साहित्य हस्तगत करण्यात यश; सिन्नर पोलीसांची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या वस्तूसंग्रह खोलीतून चोरी झालेले २३ लाख ६४ हजारांचे वैद्यकीय साहित्य १०० टक्के मिळवण्यात सिन्नर पोलिसांना यश आले असून, याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या अनिल कासार याने दिलेल्या माहितीवरून शहरातील चार नामंकित डॉक्टरांसह दोन रुग्णवाहिका चालकांनी चोरीचे साहित्य विकत घेतल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. (Success in recovering stolen medical supplies Performance of Sinner Poles Nashik News)

शहरातील डॉ. उमेश येवलेकर (पारिजात हॉस्पिटल), डॉ. राहुल शेळके (शेळके हॉस्पिटल), डॉ. गणेश नाईकवाडी (नाईकवाडी हॉस्पिटल), डॉ. श्रीकांत भडांगे (भडांगे हॉस्पिटल) यांसह अल्पेश देवरे व शिवाजी उर्फ शिवा गायधनी (रा. नाशिक रोड) या दोघा रुग्णवाहिका चालकांसह डॉक्टरांनी विकत घेतलेले चोरीचे साहित्य पोलिसांनी परत मिळवले.

सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून २८ जुलै २०२२ ते २ डिसेंबर २०२२ यादरम्यान पाच लाख ५४ हजारांचे चार मल्टिप्यारामॉनिटर (प्रत्येकी किंमत एक लाख ३८ हजार ५००), दोन लाख ४० हजारांचे चार ईसीजी मशीन (प्रत्येकी ६० हजार), ७० हजारांचे दोन सिरीज पंप (प्रत्येकी किंमत ३५ हजार,)

सहा लाखांचे तीन डीङ्गॅब्रीलेटर (प्रत्येकी किंमत दोन लाख), सहा लाखांचे तीन काँट्री उपकरण (प्रत्येकी किंमत दोन लाख) तीन लाखांचे चार बायपंप, (प्रत्येकी किंमत ७५ हजार) असे एकूण २३ लाख ६४ हजारांचे वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्या संग्रह खोलीतून चोरी झाल्याचे उघडकीस आले होते.

याप्रकरणी सिन्नर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चेतन ठोंबरे यांच्या फिर्यादीनुसार सिन्नर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून संशयित अनिल कासार याला अटक केली होती.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

पोलिसांनी कासारकडे चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने पोलिसांना सर्व सांगतिले. कासार याने सुमारे चार महिने वेळोवेळी हे साहित्य बॅगमध्ये भरून रुग्णालयातून बाहेर नेले.

त्यानंतर शहरातील डॉक्टरांकडे कॉलला जात-येत असल्याने नंदूरबार व धुळे येथून आपण काळ्या बाजारातून हे साहित्य आणले असून, तुम्हाला कमी किमतीत विकत असल्याचे सांगत त्यांना या वैद्यकीय साहित्य खरेदी करण्याबाबत गळ घातली. स्वस्तात मिळते म्हणून या डॉक्टरांनीही चोरीचे वैद्यकीय साहित्य विकत घेतले.

उपजिल्हा रुग्णालयातील साहित्य चोरीला गेल्याने तालुक्यासह जिल्हाभरात खळबळ उडाली होती. आरोग्य विभागाने या चोरीची गंभीर दखल घेऊन आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक चौकशी समितीने सोमवारी (ता. ३०)ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन सदर प्रकरणाचा अहवाल मागितला होता.

शहरातील डॉक्टरांनी या वस्तू विकत घेतल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात होता. चोरीतील एकेक गुन्हेगाराचा शोध घेतानाच पोलिसांनी चोरीला गेलेले साहित्य रिकव्हर करण्याला प्रथमता प्राधान्य दिले होते.

पोलिस अधिक्षक शहाजी उमप, अपर पोलिस अधिक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलिस अधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय माळी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामदास धुमाळ, अंकुश दराडे, राहुल निरगुडे, किरण पवार, हरिष आव्हाड यांच्या पथकाने दिवसरात्र एक करत व्यापक शोधमोहीम राबवली. शंभर टक्के रिकव्हर शासकीय वस्तू हस्तगत केल्याने ही पोलिसांची खूप मोठी कामगिरी आहे, असे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT