Police  esakal
नाशिक

नाशिक : बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश

एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

दीपक खैरनार

अंबासन (जि. नाशिक) : जायखेडा पोलिस ठाण्यातील हद्दीतील गावात एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच जायखेडा पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाव घेत होणारा बालविवाह रोखण्यात यश आले व अल्पवयीन मुलीच्या आई, वडील व नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी समजावून बालविवाह थांबविण्याच्या सूचना दिल्या व संबधितांना प्रबोधन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (ता. १८) रोजी जायखेडा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, की भडाणे (ता.बागलाण) या गावी अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार आहे अशी माहिती जायखेडा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांना मिळाल्यावरून त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी जायखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, महिला पोलिस प्रतिमा श्रीखंडे, पोलिस नाईक शरद भगरे यांना रवाना केले. त्यानंतर पथकाने भडाणे गावी जाऊन अल्पवयीन मुलीच्या आई, वडील व नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी समजावून सांगून बालविवाह थांबविण्याच्या सूचना दिल्या. सदर कारवाईत गावाचे ग्रामसेवक श्री.कोठावदे, पोलिस पाटील महेंद्र भामरे, अंगणवाडी सेविका श्रीमती ज्योत्स्ना पवार, सरपंच श्रीमती प्रमोदिनी भामरे आदिंनी बालविवाह प्रतिबंधक समितीचे सदस्य म्हणून अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना कायदेशीर बाबी समजावून सांगत पोलिसांच्या माध्यमातून सदरचा बालविवाह थांबविला असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणीही आपल्या मुलामुलींना लग्नाचे वय पूर्ण होण्याअगोदर लग्नासाठी भाग पाडू नका अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते याबाबत जायखेडा पोलिसांनी आवाहन केले आहे.

''पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलामुलींना लग्नाचे वय पूर्ण होण्याअगोदर लग्नासाठी भाग पाडू नका अन्यथा बाल विवाह प्रतिबंध कायद्यातील तरतदींनुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते.'' - नवनाथ रसाळ, उपनिरीक्षक जायखेडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT