share market esakal
नाशिक

चुकांतून धडा घेत शेअर मार्केटमध्ये नाशिकच्या विजयची 'विजयी' भरारी

अरूण मलाणी

नाशिक : आयुष्यातील यश-अपयश आपल्‍या हाती नसते. यशस्‍वी होण्यासाठी आपल्या हातात असते ती जिद्द, चिकाटी अन्‌ प्रामाणिक प्रयत्‍न. मग अपयश किती वेळाही येवो, पुन्‍हा नव्‍या जोमाने उभे राहत, नव्‍या स्‍वप्‍नांचा पाठलाग करणे, हे वाटते तितके सोपे नाही, पण आपल्‍या कृतीतून नाशिकचे विजय ठाकरे यांनी युवकांपुढे आदर्श निर्माण केलाय.

नोकरी, व्‍यवसायापासून आयुष्याच्‍या विविध टप्प्‍यांवर खचता खात असताना त्‍यातून उभारी घेताना श्री. ठाकरे आज शेअर मार्केटबाबत (Share Market) तांत्रिक प्रशिक्षण (Technical training) देत इतरांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी उपलब्‍ध करून देत आहेत. त्‍यांचा जीवनप्रवास तरुणाईसाठी प्रेरणादायी असाच आहे.

अपयशांच्‍या लाटेवर स्‍वार ‘विजय’

मुळचे नाशिक येथील विजय ठाकरे वयाच्‍या सोळाव्‍या वर्षांपासून संघर्ष करताहेत. हसण्या-खेळण्याच्‍या वयात त्‍यांनी घरोघरी पेपर टाकण्याच्‍या कामाला सुरवात केली. वडील आजारपणामुळे घरीच, आईवर कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी, कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्‍यांनी सचोटीचे प्रयत्‍न सुरू केले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना, पन्नास रुपये रोजावर अंबड येथील कंपनीत कामाला जायला लागले. इतक्‍यावर मर्यादित न राहाता मोठी स्‍वप्‍न पाहत त्‍या दिशेने वाटचाल करण्याचा दृढ निश्‍चय केला. त्‍यातून विपणन (Marketing) क्षेत्राकडे ते वळाले. घरोघरी जाऊन उत्‍पादनांची विक्री करताना केलेल्या संघर्षातून थकवा कमी अन्‌ ऊर्जा जास्‍त मिळत गेली.

कॉल सेंटरमध्ये नोकरी ते व्‍यवसाय

अपेक्षित प्रगती होत नसल्‍याचे लक्षात येताच त्‍यांनी कॉल सेंटरमध्ये (Call center) नोकरी केली. युरोपीय देशांशी (European countries) व्‍यवहार करायचा असल्‍याने रात्रपाळीत नोकरी करावी लागायची. त्‍यामुळे आरोग्‍यविषक समस्‍या सुरू झाल्या. काही दिवस काम केल्‍यानंतर भांडवल साचवत बीपीओ अर्थात, कॉल सेंटरच्या व्‍यवसायाची उभारणी केली. मात्र, काही कारणांनी व्‍यवसायातही अपयश पचवावे लागले, तरी त्‍यांनी हार मानली नाही.

शेअर बाजारात फिनिक्‍स (Phoenix) भरारी

कॉल सेंटरच्‍या कामामुळे आरोग्‍याचा प्रश्‍न निर्माण होत होता. त्यातच पर्यायांची चाचपणी करताना शेअर बाजारात पदार्पण केले. तीन वर्षांत तब्‍बल ४० लाखांपर्यंत नुकसान सोसावे लागले. आर्थिक झळ बसली, तरी त्‍यांना प्रगतीची वाट दिसली होती. यातून पुढील वर्षभर शेअर मार्केटचा बारकाईने अभ्यास केला. बीपीओच्‍या (BPO) व्‍यवसायातून सुमारे तीन लाख भांडवल जमले होते. त्‍यातून पुन्‍हा व्‍यवहार सुरू करताना यंदा मात्र प्रत्‍येक वेळी त्‍यांनी नफा नोंदविण्यास सुरवात केली. आपल्‍याकडील ज्ञानाचा फायदा इतरांनाही व्‍हावा, यासाठी शेअर मार्केटचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यास श्री. ठाकरे यांनी सुरवात केली. या वर्षी तीन महिन्यांतच चार बॅचेसला त्‍यांनी यशस्‍वी प्रशिक्षण दिले. तब्‍बल २६ देशांतील भारतीयांनी या प्रशिक्षण उपक्रमात सहभाग नोंदविला. अनेक अपयश पचविताना त्‍यांनी आयुष्यातील उमेदीच्‍या काळात फिनिक्‍स (Phoenix) भरारी घेतली आहे.

''शेअर मार्केटमधील ट्रेडिंग (Trading) हाही एका प्रकारचा व्‍यवसाय असून, प्रत्‍येक व्‍यवसायात जोखीम असतेच; पण स्‍वयंशिस्‍त, धैर्याने यश मिळविता येते हे या व्‍यवसायातून व आजवरच्‍या जीवनातून मी अनुभव घेतला आहे. तरुणांमध्ये शेअर बाजाराविषयीचा चुकीचा समज दूर करण्यासाठी त्‍यांना प्रशिक्षण देत आहे.'' - विजय ठाकरे, गुंतवणूक सल्‍लागार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT