Ashish Chavan and his father Gov. A. Nitin Pawar Municipal President Kautik Pagar while felicitating contractor Sahebrao Chavan esakal
नाशिक

Success Story: कळवणच्या आशिष चव्हाणची सहाय्यक नगररचना अधिकारी पदाला गवसणी

रवींद्र पगार

Success Story : जिद्द,चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर कळवण येथील आशिष साहेबराव चव्हाण याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळविले असून सहाय्यक नगररचना अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.

नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आशिषने हे यश संपादन केले आहे. (Success Story Ashish Chavan of Kalwan promoted to post of Assistant Town Planning Officer nashik news)

आशिष हा येथील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर साहेबराव चव्हाण यांचा सुपुत्र असून त्याचे शालेय शिक्षण शरद पवार पब्लिक स्कूल मानुर ता.कळवण येथे झाले आहे.तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण के.टी.एच.एम काॅलेज नाशिक येथे झाले आहे.

अभियांत्रिकीची पदवी त्याने के. के. वाघ इंजिनिअरिंग काॅलेज येथून प्राप्त केली असून दोन वर्ष पुणे येथे तर दोन वर्ष कळवण येथूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक नगररचना अधिकारी पदाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात आशिषने हे यश संपादन केले आहे.त्याच्या या नियुक्तीबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

"शासकीय सेवेत काम करण्याची इच्छा असल्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो.अभ्यासात सातत्य ठेवल्याने हे यश प्राप्त झाले आहे."

- आशिष चव्हाण,कळवण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

ऊसतोड महिलांचं जगणं मांडणाऱ्या 'कूस' लघुपटाला राज्यस्तरीय तिसरे पारितोषिक

Latest Marathi News Updates : कोल्हापूर जिल्ह्यातील कोपार्डे येथे भानामतीचा प्रकार

SCROLL FOR NEXT