Success Story Harshal Ghule is selected in Indian Navy nashik news 
नाशिक

Success Story: नौदलास गवसणी घातलेल्या हर्षलच्या सत्काराला जमला अख्खा गाव! प्रतिकूल परिस्थितीत संघर्षातून गरुडझेप

मूळचे कूसमाडी येथील असलेले घुले कुटुंब...घरची परिस्थिती बेताची असल्याने हर्षलचे आजोबा लक्ष्मण घुले मुलांना घेऊन राजापूर येथील आनंदा चव्हाण या मामाकडे आले.

सकाळ वृतसेवा

Success Story : राजापूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील हर्षल घुले या तरुणाची भारतीय नौदलात निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीत संघर्षातून त्याने घेतलेली गरुड झेप अख्खा गावाला अभिमानाची ठरल्याने त्याच्या सत्कारासाठी ग्रामस्थांनी एकत्रित जमून त्याच्या यशाचे सर्वांनी तोंड भरून कौतुक केले.

मूळचे कूसमाडी येथील असलेले घुले कुटुंब...घरची परिस्थिती बेताची असल्याने हर्षलचे आजोबा लक्ष्मण घुले मुलांना घेऊन राजापूर येथील आनंदा चव्हाण या मामाकडे आले. (Success Story Harshal Ghule is selected in Indian Navy nashik news)

या कुटुंबाने शेतीत अहोरात्र कष्ट करत आपल्या कुटुंबाची घडी बसवली. त्यांचा मुलगा संतोष हा कमी शिकलेला असून प्रगतिशील शेतकरी म्हणून या भागात परिचित आहे. वडिलांच्या याच संस्कार व कष्टाची जाणीव ठेवत हर्षलने शेती करत राजापूरच्या भैरवनाथ वस्तीमधील जिल्हा परिषदेच्या व पुढे माध्यमिक विद्यालयात आपले बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

पुढे पुणे येथे एनडीए डिफेन्स अकॅडमीत त्याने शिक्षण घेत प्रतिकूल परिस्थितीत संघर्षाच्या जोरावर नौदलातील यशाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे या परिसरात नौदलात सेवेत सहभागी झालेला तो पहिला तरुण ठरला. वयाच्या १९ व्या वर्षी थेट नौदलात नोकरी लागल्याने घुले व चव्हाण कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी डीजेच्या तालावर ठेका धरत हर्षलच्या निवडीचा आनंदोत्सव साजरा करून त्याला शुभेच्छा दिल्या.

हर्षलच्या आजी इंदुबाई, आजोबा लक्ष्मण घुले यांनी गवत विकून आपल्या संसाराचा गाडा चालविला. पुढे संतोष व भाऊसाहेब व हर्षलची आई शिनाबाई, काकी मनीषा यांनी चिकाटी व मेहनतीने मुलांना शिक्षणासाठी मदत केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच सुभाष वाघ होते. प्रमुख पाहुणे म्हणून शरद आगवन, सुरेश आगवन, कारभारी विंचू, पुंडलिक विंचू, प्रभाकर गायकवाड, नामदेव सानप आदी उपस्थित होते. यावेळी माध्यमिक विद्यालयातर्फे राजेंद्र वाघ, बापूसाहेब दराडे व साहेबराव घुगे यांनी हर्षलचा सत्कार केला. आष्टी तालुक्यातील तरुण शुभम नाथा घुले यांची भारतीय नौदलात भरती झाल्याने यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. लक्ष्मण घुगे यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक रामकृष्ण घुगे यांनी आभार मानले.

माजी सरपंच आनंदा चव्हाण, मीराबाई चव्हाण, हिराबाई चव्हाण, सुनिता चव्हाण, संगीता चव्हाण, उज्वला चव्हाण, ज्योती चव्हाण यांनी हर्षल कुटुंबाचा सत्कार केला. यावेळी समाधान चव्हाण, काशिनाथ चव्हाण, अनिल अलगट, दत्तू चव्हाण, संतोष घुले, भाऊसाहेब घुले, अरुण चव्हाण, प्रमोद बोडखे, पोपट आव्हाड, साखरचंद घुगे, रामदास घुगे, ज्ञानेश्वर वाघ, सुरेश केदार, शरद वाघ, शंकर मुंडे, भगवान वाघ, साहेबराव नागरे, दिनकर वाघ, गोरखनाथ वाघ, गणेश गायकवाड, अशोक विंचू, संतोष जाधव, शंकर मगर, शंकर अलगट, आनंदा वाघ, सागर अलगट, गोकूळ वाघ, भाऊसाहेब बैरागी, संतोष भाबड, रोहिदास भाबड, गोकूळ घुगे, पप्पू बोडखे, प्रभाकर भाबड, दत्तू वाघ, वाल्मीक सानप आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT