om khairnar esakal
नाशिक

Success Story: अंदरसूलच्या ओम खैरनारची गगनभरारी! ISROतील प्रवेशासाठी मानाच्या एरोस्पेस अभियांत्रिकीसाठी निवड

संतोष घोडेराव

Success Story : अंदरसूलच्या मातीत शिक्षणाच्या बाबतीत जणू काही शंभर नंबरी सोनं दडलं की काय, याची प्रचीती पुन्हा एकदा आली.

येथील ओम खैरनार याची आशियातील पहिले विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या तिरुवनंतपुरम येथील भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेत (IIST) पुढील शिक्षणासाठी निवड झाली.

अंदरसूलकरांच्या शिरपेचात यामुळे मानाचा तुरा खोवला गेला आहे. (Success Story Om Khairnar of Andarsul Selection for Honorable Aerospace Engineering for admission to ISRO nashik)

येथील शेतकरी कुटुंबातील बाबूराव खैरनार यांचा ओम नातू आहे. त्याची तिरुवनंतपुरम येथे एरोस्पेस अभियांत्रिकीच्या पुढील शिक्षणासाठी निवड झाली. ओमने दहावीत ९५ टक्के गुण मिळविले होते.

बारावीनंतर जेईई मेन्सची तयारी करून JEE advanced मध्ये पाच हजार ३४७ रँक घेत IIST तही २३० ऑल इंडिया रँक मिळविल्याने त्याची भारतीय अंतराळ संशोधन संस्था, तिरुवनंतपुरम येथे एरोस्पेस अभियांत्रिकीसाठी जेईई अॅडव्हान्सद्वारे निवड झाली.

त्यामुळे त्याचे ‘इस्रो’त जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या शैक्षणिक प्रवासात आपण स्वतःला मोबाईल आणि टीव्हीपासून दूर ठेवल्यानेच हे यश संपादन केल्याचे तो सांगतो. विशेष म्हणजे ओमच्या रूपानं अंदरसूलची उच्चशिक्षित तरुणाचे गाव म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ‘आयआयएसटी’चे कुलपती होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारच्या अंतराळ विभागाच्या अंतर्गत असून, IIST मध्ये अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुप्रयोगांवर लक्ष केंद्रित करून नियमित अभियांत्रिकी पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम राबविले जातात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याआधीही अंदरसूलसारख्या ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी कुटुंबातील समीर रोकडे याची इंग्लंडमधील शिक्षणासाठी निवड झाली होती. शेतकरी कुटुंबातीलच अमोल सोनवणे याची रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी जपानमधील विद्यापीठात निवड झाली होती.

दोन महिन्यांत अंदरसूलमधून दुसरा विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जात आहे. अथर्व गाडे हा आयआयटी मुंबई येथे शिक्षण घेत असून, ट्रीपल आयटी अलाहाबाद येथे आदित्य रामदास खैरनार हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे उच्चशिक्षण घेत आहे.

"अंदरसूलसारख्या खेडेगावातून शेतकऱ्यांची मुलं इतक्या उच्चशिक्षणासाठी जात आहेत, ही गावासाठी नक्कीच भूषणावह बाब आहे."- उज्ज्वल जाधव, शेतकरी, अंदरसूल

"ग्रामीण भागातून जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर उच्चशिक्षणासाठी गावची मुले परदेशी जाऊन गावाचा नावलौकीक वाढवत आहेत, याचा सर्वांना नक्कीच अभिमान आहे."

- संतोष खैरनार, सामाजिक कार्यकर्ते, अंदरसूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT