Preshit Kale wesakal
नाशिक

Success Story: जिद्द, चिकाटीने ‘प्रेषित’ आर्मड पोलिस फोर्सेसमध्ये! देशसेवेचे स्‍वप्‍न केले पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

Success Story : अगदी शालेय जीवनापासून देशसेवेचे व्रत घेताना त्‍याने झोकून देत तयारी केली. जीवनप्रवासात अनेक अडथळे आले, पण अखेर अडथळ्यांची शर्यत पार करताना सेंट्रल आर्मड पोलिस फोर्सेसमध्ये यशस्‍वी कामगिरी करत असिस्‍टंट कमांडंट होण्याचा बहुमान मिळविला.

जिद्द, चिकाटीच्‍या जोरावर यशोशिखर गाठणाऱ्या या युवकाचे नाव आहे प्रेषित रमेश काळे. या युवकाचा प्रवास प्रत्‍येक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. (Success Story Perseverance preshit in Armed Police Forces dream of national service fulfilled nashik news)

लहानपणापासून प्रशासकीय सेवेतून समाजकार्य करत असलेल्‍या आपल्‍या वडिलांचा आदर्श घेताना प्रेषितने लहानपणीच आगळे-वेगळे करिअर करण्याचा ध्यास घेतला. इतर मुले खेळत-बागडत असताना त्‍याने लष्करात अधिकारी होण्याचे स्‍वप्‍न पाहाण्यास सुरवात केली.

त्‍यादृष्टीने वाटचालदेखील सुरु केली. अगदी नियोजनबद्ध तयारी करताना त्‍याने राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी (एनडीए) च्‍या माध्यमातून लष्करी अधिकारी होण्याच्‍या दृष्टीने प्रयत्‍न सुरू केले. नाशिकमधील किलबिल स्‍कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर एनडीएच्‍या तयारीसाठी औरंगाबाद येथील एसपीआय संस्‍थेत प्रवेश मिळविला.

तेथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना त्‍याने एनडीए प्रवेश परीक्षेची तयारी सुरु ठेवली. अभ्यासासोबत हॉकी व अन्‍य खेळांमध्ये पारंगत असलेल्‍या प्रेषितला खेळादरम्‍यान दुखापत झाल्‍याने काही कालावधीसाठी विश्रांतीचा सल्‍ला डॉक्‍टरांनी दिला.

एनडीए प्रवेशाचे स्‍वप्‍न भंगले तरी निराश न होता प्रेषितने अन्‍य पर्यायाचा शोध घेतला. अगदी दहावीपासून घरापासून दूर राहात असताना, पुढे पुण्यातील सिंहगड महाविद्यालयातून सिव्‍हिल इंजिनिअरिंग शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.

प्रसंगी स्‍पर्धा परीक्षांच्‍या तयारीसाठी त्‍याने थेट दिल्‍ली गाठली. केंद्रीय लोकसेवा आयोग व अन्‍य विविध परीक्षांच्‍या तयारीत स्‍वतःला झोकून दिले. युपीएससीच्‍या काही परीक्षांमध्येही अपयश आले. पण खचून न जाता त्‍याने प्रयत्‍नांमध्ये सातत्‍य ठेवले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अखेर या युवकाने सेंट्रल आर्मड पोलिस फोर्सेसमध्ये असिस्‍टंट कमांडंट होण्याचा बहुमान मिळविला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्‍या सेंट्रल आर्मड पोलिस फोर्सेस परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

आयोगाने राष्ट्रीय स्‍तरावरील परीक्षार्थींतून निवड केलेल्‍या ४१ उमेदवारांच्‍या यादीत प्रेषितने सहावे स्‍थान राखताना राष्ट्रीय पातळीवर यशस्‍वी कामगिरी केली आहे. आपल्‍या या यशात आई-वडील, बहिण, दाजी यांच्‍यासह कुटुंबीय व मित्रपरिवाराचे वेळोवेळी पाठबळ लाभल्‍याचे त्‍याने सांगितले.

सेवेचा वारसा नेला पुढे

नाशिकच्‍या विभागीय आयुक्‍त कार्यालयातील उपायुक्‍त रमेश काळे यांचा प्रेषित हा चिरंजीव. वडिलांना प्रशासकीय सेवेतून समाजकार्य करताना पाहून त्‍यानेही सेवेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार केला.

लष्करात भूदल किंवा वायुदलातून देशसेवेचे स्‍वप्‍न त्‍याने प्रारंभी पाहिले होते. आता केंद्रीय स्‍तरावरील पोलिस दलातील सेवेतून तो काळे कुटुंबातील सेवेचा वारसा पुढे नेण्यास सज्‍ज झालेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT