Akshay Gupta esakal
नाशिक

Success Story : शिवडीच्या अक्षयची ‘बीएआरसी’मध्ये गरुडभरारी; निवड परीक्षेमध्ये देशभरातून दुसरा

माणिक देसाई

Success Story : द्राक्षांकरता प्रख्यात असलेल्या शिवडी या खेडेगावातील अक्षय शांतिलाल गुप्ता (२७) या तरुणाने आपली बुद्धिमत्ता व परिश्रमाच्या बळावर देशातील संशोधन क्षेत्रात अग्रमानांकित असलेल्या भाभा अणुसंशोधन केंद्राद्वारे घेण्यात आलेल्या निवड परीक्षेमध्ये देशभरातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. (Success Story Shivdi Akshay in BARC 2nd from country in selection exam nashik news)

अक्षयचे बालपण अतिशय गरिबीत व प्रतिकूल परिस्थितीत गेले आहे. शाळा न शिकलेल्या निरक्षर आईने मोलमजुरी करून अक्षय आणि त्याच्या दोन भावंडांना लहानाचे मोठे केले. आपल्याला शिकता आले नसले तरी मुलांनी जास्तीत जास्त शिकून मोठे व्हावे हीच त्या माऊलीची इच्छा होती.

आईचे कष्ट बघत मोठे झालेल्या अक्षयनेही प्रचंड कष्ट करीत प्रत्येक वर्गात पहिला क्रमांक टिकून ठेवला. दहावीच्या परीक्षेत देखील त्याने ९३ टक्के मार्क मिळवून केंद्रात पहिले स्थान मिळविले होते. पहिली ते चौथीपर्यंतचे त्याचे शिक्षण शिवडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर पाचवी ते दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण उगावच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात पूर्ण केले.

नांदेड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने स्थापत्यशास्त्रामध्ये बी. टेकची पदवी त्याने चांगल्या गुणांनी पटकावली. या परीक्षेत त्याला रौप्यपदक मिळालेले होते. विशेष म्हणजे या संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीमध्ये त्याने कुठेही खासगी क्लासेस किंवा ट्यूशनचा आधार घेतला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या संपूर्ण वाटचालीमध्ये त्याचे मोठे मामा (कै) हनुमंत बसप्पा कानडे आणि त्यांचे दोन्ही बंधू रामदास आणि अंबादास कानडे यांनी अक्षयला खूप मोलाची मदत केली. त्याचा धीर खचणार नाही याकडे सतत लक्ष दिले.

त्यामुळे आपली आई ही आपले प्रेरणास्थान आहे तर तीनही मामा आपले आधारस्तंभ आहेत असे तो अतिशय नम्रपणे नमूद करतो. निफाड येथील नगरपंचायतीतर्फे चालविल्या जाणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक बा. य. परीट गुरुजी अभ्यासिकेमध्ये तो पहाटे पाचपासून रात्री अकरापर्यंत अभ्यास करत होता.

"परिस्थिती कितीही अवघड व प्रतिकूल असली तरी आपला निर्धार पक्का असेल तर यश मिळाल्याशिवाय राहात नाही. तरूणांनी निवडक मार्ग स्वीकारण्यापेक्षा सध्याच्या स्पर्धेच्या युगात अधिक बहुश्रुत होणे आवश्‍यक आहे." - अक्षय गुप्ता, शिवडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT