धुळे : मुख्य अंकातील पानासाठी...
--
धुळ्यात ७० वर्षीय महिलेच्या पोटातून काढली गाठ
--
एसीपीएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या यशस्वी शस्त्रक्रियेची कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ६ : खानदेशातील ग्रामीण व दुर्गम भागासाठी आरोग्यतीर्थ ठरलेल्या जवाहर मेडिकल फाउंडेशन संचलित एसीपीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय क्षेत्राला हेवा वाटावा असा चमत्कार घडला. येथील निष्णात डॉक्टरांच्या पथकाने एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या पोटातून तब्बल २८ आठवड्यांच्या गरोदरपणाएवढी मोठी गाठ यशस्वीरीत्या काढण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान महिलेची हिस्टेरेक्टॉमी (गर्भाशय काढून टाकणे) देखील करण्यात आली असून, सध्या संबंधित रुग्णाची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे.
-
एसीपीएम रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सदर महिला गेल्या काही दिवसांपासून पोटात सतत होणारे दुखणे, ओढ लागल्यासारखे वाटणे आणि लघवीचा त्रास यांसारख्या गंभीर समस्यांमुळे त्रस्त होती. वैद्यकीय तपासणी दरम्यान तिच्या पोटात एक मोठी गाठ असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे रुग्णाला थायरॉईडचा जुना त्रास असल्यामुळे ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक आणि मोठी जोखमीची होती. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी पूर्वतयारी म्हणून ट्यूमर मार्कर्स, एमआरआय आणि इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या करत रुग्णाचा फिटनेस यशस्वीरित्या मिळवला.
-
सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्णावर एक्सप्लोरेटरी लॅप्रोटोमी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. एसीपीएम रुग्णालयातील भूलतज्ज्ञ डॉ. मनोज कोल्हे आणि डॉ. संदीप पवार यांनी दक्षता घेत रुग्णाला सुरक्षितपणे भूल दिली. नंतर शल्यचिकित्सक डॉ. अमोल कोराणे यांनी कौशल्याच्या बळावर ही गाठ आणि गर्भाशय सुरक्षितपणे शरीराबाहेर काढले. या शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. सौरभ निकुंभ यांनी स्टँड- बाय सर्जनची भूमिका पार पाडली. काढलेली गाठ आणि गर्भाशय पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
-
या गुंतागुंतीच्या आणि जोखमीच्या शस्त्रक्रियेच्या यशाबद्दल जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल पाटील, सचिव डॉ. ममता पाटील आणि एसीपीएम मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. नितीन कुलकर्णी यांनी शस्त्रक्रिया करणारे शल्यचिकित्सक डॉ. अमोल कोराणे, भूलतज्ज्ञ डॉ. मनोज कोल्हे, डॉ. संदीप पवार, स्टँड-बाय सर्जन डॉ. सौरभ निकुंभ यांच्यासह सर्व परिचारिका व संबंधित कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.