नाशिक

वृद्धाची ब्रेन हॅमरेजवरील जटील शस्त्रक्रिया यशस्वी

CD
बातमी आवश्‍यक NSK26H33949 (डॉ. अनिकेत पाटील) ----- वृद्धाची ब्रेन हॅमरेजवरील जटील शस्त्रक्रिया यशस्वी उपशीर्षक न्युरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांचे यश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २९ : अपघाताने डोक्याला झालेली गंभीर दुखापत आणि मेंदूत झालेला रक्तस्राव.. अशा अत्यंत नाजूक परिस्थितीत मृत्युशी झुंज देणाऱ्या एका ८३ वर्षीय वृद्धास डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदूरोग शल्यचिकित्सक (न्युरोसर्जन) डॉ. अनिकेत पाटील यांच्या कुशल उपचारांमुळे नवजीवन मिळाले आहे. ब्रेन हॅमरेजची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केल्यानंतर रुग्णास जीवदान मिळाले. एक वयोवृद्ध आजोबा स्वच्छतागृहात पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागला. त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. डॉ. अनिकेत पाटील आणि डॉ. विपुल राठोड यांनी तातडीने तपासणी सुरू केली. सीटी स्कॅन तपासणीत मेंदूत रक्तस्राव (ब्रेन हॅमरेज) झाल्याचे निदान झाले. याशिवाय शरीराच्या एका बाजूच्या हात-पायांची ताकदही कमी झाल्याचे आढळून आले. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. रुग्णाचे वय ८३ वर्षे असल्याने शस्त्रक्रिया करणे हे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. डॉ. अनिकेत, डॉ. विपूल आणि डॉ. अदिती जोशी यांच्या वैद्यकीय पथकाने आवश्यक खबरदारी घेत शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. उपचार आणि योग्य वैद्यकीय देखभालीमुळे त्यांच्या प्रकृतीत सकारात्मक बदल दिसून आले. ---- कोट.. वृद्ध व्यक्तींमध्ये पडल्यामुळे डोक्याला मार लागणे ही बाब अत्यंत गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. अशा वेळी रुग्णालयात दाखल करून सीटी स्कॅनसारख्या आवश्यक तपासण्या करणे गरजेचे आहे. योग्य वेळी निदान आणि आवश्यक उपचार मिळाल्यास गंभीर परिस्थितीतही रुग्ण बरा होऊ शकतो. - डॉ. अनिकेत पाटील -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Youth Congress Protest in Karad Against Sanjay Gaikwad : शेतकऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध; कऱ्हाडमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवत युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

Sakal Impact : 'सकाळ' इम्पॅक्ट; एमपीएससी गैरव्यवहार चौकशीला अखेर मुहूर्त, १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

Pattankodoli Birdev Yatra Farande Baba Bhakanuk : राज्यासह केंद्रात राजकीय उलथापालथ होईल, देशात आंदोलने होतील; पट्टणकोडोली फरांडे बाबांची भाकणूक उत्साहात संपन्न

Diwali Water Supply Update in Pune : दिवाळीत पुणेकरांना मोठा दिलासा; ५ नोव्हेंबर रोजीची गुरुवारची पाणी कपात रद्द, सुरळीत पाणीपुरवठा होणार

SCROLL FOR NEXT