NAMCO Hospital esakal
नाशिक

Nashik News : अंथरुणावर खिळलेल्या चिमुकलीवर नामकोत यशस्‍वी शस्‍त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पायाच्‍या भागात झालेल्‍या ‘ऑस्टिओक्लॅस्टोमा’ या दुर्मिळ आजारामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या पंधरा वर्षीय मुलीला नामको रुग्‍णालयात जीवनाची नवी दिशा मिळाली आहे. येथील डॉक्‍टरांनी चिमुकलीची यशस्‍वी शस्‍त्रक्रिया केली असून, यामुळे ती चालायला लागली आहे. (successful surgery on girl child at NAMCO Nashik News)

नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचालित पेठ रोडवरील नामको हॉस्पिटलमध्ये साधना बुधर नावाची एक १५ वर्षीय मुलगी दाखल झाली होती. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे तब्बल ४ वर्षे ती उपचारांपासून वंचित राहिली होती.

परिणामी आजार वाढत गेल्याने ती हळूहळू अंथरुणाला खिळत गेली. त्यानंतर चार वर्षे ती त्याच अवस्थेत असहाय्य होती.

२०२० मध्ये साधना बुधर हिच्‍या उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ सूज आली. दिवसेंदिवस सूज वाढण्यासह वेदना वाढत गेल्‍या. यामुळे तिला चालण्यासाठीदेखील त्रास होऊ लागला.

गुडघ्याजवळील भागात जाणवणारी लिंबूएवढ्या आकाराची गाठ वाढत थेट संत्रीच्या आकाराइतकी मोठी झाली होती. सोबतच तिच्या वेदनादेखील वाढत होत्या.

स्थानिक पातळीवर डॉक्टरांकडून उपचार घेतले. परंतु, त्यानंतरही तिला बरे वाटत नव्‍हते. कालांतराने तज्ज्ञ डॉक्टरांना दाखविल्यानंतर तिचा एक्स-रे, एमआरआय आणि बायप्सी या चाचण्या केल्‍या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यातून साधनाला ऑस्टिओक्लॅस्टोमा हा दुर्मिळ आजाराचे निदान झाले. परंतु, तिची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने तिने तब्बल २ वर्षे कुठल्याही स्वरूपाचे उपचार न घेता केवळ दिवस ढकलले. या कालावधीत ती खाटेवरच पडून होती.

साधे चालणेही तिच्यासाठी कठीण झालेले होते. अखेर तिच्या कुटुंबीयांना नामको हॉस्पिटलबाबत माहिती झाल्यानंतर आर्थिक विवंचनेत असलेल्या या कुटुंबाने मुलीला उपचारांसाठी नामकोत दाखल केले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिला आशेचा नवा किरण दिसला.

हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग तज्ज्ञ तथा मस्क्युलोस्केलेटन ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. प्रफुल्ल रावते यांनी तपासणी केली. कृत्रिम सांधा प्रत्यारोपणाचा खर्च झेपावणारा नसल्याने तिचा गुडघा वाचवून शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.

अत्यंत आधुनिक स्वरूपाच्या क्युरेटेज आणि बोन सिमेंट या प्रकारच्या उपचार पद्धतीतून तिच्या सांध्यात टिटॅनियमची प्लेट बसविली.

आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नामको रुग्‍णालयात यशस्वीरीत्या पार पडली. शस्त्रक्रियेच्या आठवड्याभरातच साधना चालायला लागली. त्यामुळे तिच्या जीवनाला नवी दिशा देण्याची भरीव कामगिरी रुग्‍णालयातील टीमने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT