Pregnant Women esakal
नाशिक

Nashik News : गर्भवतीवर अर्धांगवायूच्या झटक्‍यानंतर यशस्‍वी उपचार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रसूतीची वेळ जवळ आलेली असताना चोवीसवर्षीय गर्भवती महिलेस अर्धांगवायूचा झटका आला. या महिलेला (Women) नवजीवन देण्यात वोक्हार्ट हॉस्पिटलचे मेंदूविकार तज्‍ज्ञ

डॉ. विशाल सावळे व टीमला यश आले आहे. (Successful treatment after paralytic stroke in pregnant women by doctor nashik news)

नवीन पाहुणा येणार असल्‍याने औरंगाबाद येथील डॉक्टर जोडपे आनंदी होते. परंतु प्रसूतीची वेळ जवळ आलेली असताना चोवीस वर्षीय गर्भवती महिलेला अचानक ताप आल्याने लोणी येथील रुग्णालयात दाखल केले.

यावे ळी गर्भवतीस अर्धांगवायूचा झटका आल्‍याने सतत आकडी येऊन बेशुद्ध होत होत्‍या. तसेच डेंगीचे निदान झालेले असताना प्रसूतीदेखील करण्यात आली. मात्र श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे बाळ दगावले.

रुग्णाची परिस्थिती खालावल्याने तिला नाशिकच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डेंगी सतत येणारी आकडी आणि बेशुद्धावस्थेतच असल्याने महिला रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल केले. महिलेच्या प्लेटलेट्स ४० हजाराहून कमी झाल्याचे निदर्शनात आले. तसेच प्रेस सिंड्रोमचे निदानही झाले होते.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

अशा संघर्षमय परिस्थितीतून रुग्‍णालयातील मेंदूविकार तज्‍ज्ञ डॉ. विशाल सावळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली महिला रुग्‍णावर यशस्‍वी उपचार करण्यात आले आहे. पहिले दोन दिवस कोमात राहिल्‍यानंतर रुग्‍णाने तिसऱ्या दिवशी उपचारांना प्रतिसाद दिला. महिलेच्या लघवीतून रक्त जात असल्‍याने हेमट्युरियाचे निदानासोबत व्हायरल न्यूमोनिया आढळून आला.

सातव्या दिवशी तिचा व्हेंटिलेटर काढण्यात आला असून रुग्णावर फिजीओथेरेपीद्वारे शारीरीक हालचाली पूर्ववत करण्यासाठी प्रयत्‍न करण्यात आले. दहाव्या दिवशी रुग्ण स्वतःच्या पायावर चालायला लागल्‍यानंतर तिला घरी सोडल्‍याची माहिती डॉ. सावळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ! चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

Latest Marathi News Live Update : नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १४ कोटींचा विकास आराखडा

आई झाल्यावर पहिल्यांदाच दिसली कतरिना, चाहत्यांना बघत क्यूट स्माइल देत केलं असं काही की... VIRAL VIDEO

Stock Market Today : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; IT शेअर्समध्ये वाढ; कोणते शेअर्स तेजीत?

Donald Trump : कोट्यवधी लोकांचा बळी गेला असता, भारत-पाक अणुयुद्ध मी थांबवले; ट्रम्प यांचा पुनरूच्चार

SCROLL FOR NEXT