Nashik news esakal
नाशिक

Nashik News : सुदाम भागुजी सांगळे वकील यांचे निधन; वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : सिन्नर तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती, जिल्हा परिषद सदस्य, लोक शिक्षण मंडळाचे संस्थापक , डोंगरे वस्तीगृह व क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे सदस्य, शिक्षण, समाजकारण, राजकारण, सहकार क्षेत्रातील स्वातंत्र्योत्तर काळातील दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी सुदाम (दाजी) भागुजी सांगळे वकील यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी दुःखद निधन झाले. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात शनिवारी रात्री १०.३८ वा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कार्य सांगळे सरांचे

सिन्नर पंचायत समितीचे पहिले सभापती, नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, व्ही एन नाईक एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, लोकशिक्षण मंडळ सिन्नर संस्थेचे संस्थापक, सिन्नर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ,असे विविध पदे भूषविलेले सिन्नर तालुक्याचे भूषण आदरणीय तपस्वी अँड. सुदामराव भागूजी सांगळे अर्थात दाजी यांचे वयाच्या 98 व्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवारी दुःखद निधन झाले.

1960 च्या कालखंडात सिन्नर या ठिकाणी वकिली व्यवसाय सुरू करून सिन्नर तालुक्यात संपूर्ण दौरा करून लोकांच्या समस्या समजावून घेऊन त्या कामी प्रामुख्याने राज्यातील मुख्यमंत्र्यांना विनंती करून सिन्नरला भोजापूर धरणाची मुहूर्तमेढ रोवली.

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या विचाराने प्रभावित होऊन महाराष्ट्रातील पहिला वसंत बंधारा दोडी या ठिकाणी बांधला. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी लोकशिक्षण मंडळ सिन्नर संस्थेचे नांदूर शिंगोटे येथील शाळेला व्ही पी नाईक हायस्कूल असे नाव दिले.

शैक्षणिक संस्था स्थापन करून शेकडो युवकांना रोजगाराची नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. ज्याला खरंच नोकरीची गरज आहे अशा गरजवंतांना विविध संस्थांमध्ये पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये दाजींनी नोकरी दिली. सिन्नर तालुक्याचे माजी आमदार सूर्यभान गडाख, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तुकाराम दिघोळे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या खांद्याला खांदा लावून सिन्नरच्या विकासासाठी सतत 50 वर्ष काम केले.

असा विकासाचा महामेरू, एक शांत, संयमी व्यक्तिमत्व, निष्कलंक व सात्विक व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले. असंख्य हजारो तरुणांचे आदर्श , एक सच्चा वकील तसेच अनेकांना रोजगार देणारा हा दाता आज पडद्याच्या आड गेल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

सुदाम दाजी यांना आदरांजली वाहण्यासाठी सकाळपासूनच सिन्नर येथील त्यांच्या निवासस्थानी तानाजी चौकात सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक अशा विविध स्तरातील नागरिकांची अलोट गर्दी दिसून आली अनेकांचे कैवारी असलेले सांगळे कुटुंबीय आज दुःखाच्या सागरात बुडाले आहेत असेल मी नसेल मी माझ्या कार्यातून दिसेल मी अशा या वाक्याचा बोध घेऊन सुदाम दाजी यांचे कार्य सतत तरुणांना दिशा नक्कीच देत राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT