sudarshan sonawane from lohoner passed the upsc exam  Sakal
नाशिक

संयमातून सुदर्शनची यशाला गवसणी; सहाव्‍या प्रयत्‍नात गाठले ध्येय

अरुण मलाणी

नाशिक : अपयश आले तर अनेक जण खचून आपला रस्‍ता बदलणे पसंत करतात. पण एक, दोन नव्‍हे तर तब्‍बल सहावेळा अपयश पचविताना लोहोणेर (ता. बागलाण) येथील सुदर्शन नानासाहेब सोनवणे याने नागरी सेवा परीक्षेत यशातून कसर भरून काढली आहे. संयमातून यशाला गसवणी घालणारा सुदर्शनची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्‍यंत सामान्‍य आहे.


लोहोणेर येथील नानासाहेब सोनवणे हे महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळच्‍या पंचवटी आगारात वाहक म्‍हणून नोकरीस आहेत. आपल्‍या मुलांनी खूप शिकावे, अशी त्‍यांची सुरवातीपासून भावना राहिली. सुदर्शन घरातील सर्वांत मोठा मुलगा असल्‍याने, त्‍याकडून भरपूर अपेक्षा होत्‍या. खेडगाव (ता. दिंडोरी) येथून बारावीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून घेतल्‍यानंतर पुढे कला शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केले. २०१४ ला पदवी प्राप्त केल्‍यानंतर स्‍पर्धा परीक्षांकडे वळण्याचा निर्णय घेतला. थेट पुणे गाठत तयारी सुरू केली. कोरोना‍ अडथळ्यात अभ्यासात खंड पडू न देता नाशिकला अभ्यास सुरू ठेवला. कुटुंबीयांसह आई रंचना व दोघा लहान भावांकडून पाठबळ मिळाल्‍याचे सुदर्शन सांगतो.

दोन वेळा हुलकावणी

यूपीएससी परीक्षांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्‍याने सुदर्शनने एमपीएससी परीक्षा दिल्‍या नाहीत. यादरम्‍यान यूपीएससी परीक्षेत सहा वेळा यश आले. यापैकी दोन वेळा तर मुलाखतीपर्यंत मजल मारली होती. परंतु थोडक्‍यात संधी हुलकली होती.


गुणवत्तापूर्ण अभ्यास महत्त्वाचा

मिळालेल्‍या यशाविषयी सुदर्शन म्‍हणाला, की आपण किती तास अभ्यास करतो, यापेक्षा अभ्यासाची गुणवत्ता कशी आहे, यावर यश अवलंबून असते. सुरवातीच्‍या काळात मीदेखील दहा, बारा तास अभ्यास करायचो. परंतु नंतर मर्यादित वेळ परंतु लक्षपूर्वक अभ्यास करायला सुरवात केली. स्‍वयंअध्ययन हा महत्त्वाचा घटक असल्‍याचेही आवर्जून नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Deepke: मुलाने दिला लढा, सरकार झुकलं; आईच्या एका वाक्याने अनेकांचे डोळे पाणावले... दिपकेंच्या गावात जल्लोष! Video Viral

IND vs ZIM: MY BAD...! ईशान किशनने सोपा रन-आऊट सोडला अन् डोक्यालाच हात लावला; Video Viral

Pune Crime: पोलिस चौकीत सुरू होता 20 लाखांचा डाव? नऱ्हे दरोड्याचं रहस्य उलगडलं; २ पोलिस अन् तोतया पत्रकार जाळ्यात, पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ

Latest Marathi News Update : अंधभक्ताविरोधात देशभक्त जिंकले, मोदीजी आतातरी देशाकडं लक्ष द्या : उद्धव ठाकरे

ED Action: मुंबईत ईडीची मोठी कारवाई! रंगशारदा हॉटेलसह ३३२ कोटींच्या मालमत्ता जप्त, भूखंडाचाही समावेश

SCROLL FOR NEXT