Shiv Sena (Thackeray group) speaking at the meeting, Municipal Pramukh Sudhakar Badgujar. Neighbors Vinayak Pandey, Devanand Birari etc. esakal
नाशिक

Sudhakar Badgujar News: गद्दारांना जनताच धडा शिकवेल : सुधाकर बडगुजर

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : शिवसेनेने समाजात ओळख दिली, मोठी पद मिळवून दिली, मान आणि प्रतिष्ठा दिली. त्याच शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना जनताच जागा दाखवून देईल असा विश्वास शिवसेना (ठाकरे गट) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी राजीवनगर येथे व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक ३१ मध्ये निष्ठावान शिवसैनिकांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. (Sudhakar Badgujar statement about shivsena shinde group nashik news)

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

या प्रसंगी, माजी महापौर विनायक पांडे, उपजिल्हाप्रमुख महेश बडवे, शिवाजी गायधनी, देवानंद बिरारी, बंडू दळवी, सागर देशमुख, बाळकृष्ण शिरसाट, संदेश एकमोडे, नीलेश साळुंखे आदी उपस्थित होते. श्री. बडगुजर म्हणाले, कोरोनाकाळात शिवसेनेने रक्तदान शिबिरे भरून नागरिकांना जीवदान दिले.

प्रभाग ३१ मध्ये एका गद्दार नगरसेवकाने तर ऑक्सिजन प्लांट उभारला होता, तरीदेखील प्रभागातील एकाही नागरिकाला मोफत ऑक्सिजन दिला नाही, असे सांगितले. श्री. पांडे यांनी नाशिकच्या खासदाराने गद्दारी केल्याचे नमूद केले.

महेश चव्हाण यांची उपविभाग प्रमुखपदी तर निखिल लभडे, हर्षल लांडगे यांची शाखाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

बडगुजर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सुनील वाघ, माधव पाटील, नंदू आमले, दिलीप वाजे, शेखर मगर, सौरभ घुमरे, संतोष लोहकरे, अमोल राजपूत, नईम शेख, गौतम लोखंडे, अमोल चांदगुडे, बन्सिल पटेल, कौस्तुभ दळवी आदी उपस्थित होते. शिवसेना प्रणीत अष्टविनायक मित्र मंडळ, राजीवनगर शाखेने संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

SCROLL FOR NEXT