नाशिक

‘सुधर्मा’तर्फे कचरावेचक महिलांना दिवाळी किराणा वाटप

CD
NSK26H34243 जळगाव : ‘सुधर्मा’च्या किराणा वाटप कार्यक्रमात (मध्यभागी) हेमंत बेलसरे, सुनीता बेलसरे, शिवाजी गायकवाड, भारती गायकवाड, अर्चना बारी, विनोद बारी, दिनकर बाविस्कर आदी. --- ‘सुधर्मा’तर्फे कचरावेचक महिलांना दिवाळी किराणा वाटप निष्काम कर्मसेवेसाठी अर्चना विनोद बारी, शिवाजी गायकवाड यांचा विशेष सन्मान सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १ : दिवाळीचा आनंद समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत पोहोचावा, या सामाजिक भावनेतून सुधर्मा सामाजिक संस्थेतर्फे शहरातील तांबापुरा, मेहरूण, हुडको आणि खेडी परिसरातील २५ कचरावेचक महिलांना दिवाळीनिमित्त किराणा साहित्य व फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत महिलांना तेल, बेसन, तूरडाळ, मूगडाळ, चहा, शेंगदाणे तसेच मिठाई आणि चिवडा देण्यात आला. दिवाळीच्या सणात या महिलांच्या कुटुंबालाही आनंदाचा क्षण अनुभवता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश होता. यावेळी समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या दोन व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला. अर्चना विनोद बारी आणि शिवाजी गायकवाड यांना शाल, पुष्पगुच्छ आणि भगवद्गीतेची प्रत भेट देऊन गौरविण्यात आले. अर्चना बारी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सुधर्मा संस्थेचे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी त्यांच्या शिक्षणासाठी, सायकलसाठी तसेच नोकरी मिळविण्यासाठी वेळोवेळी मदत केली. त्यांच्या सहकार्यामुळे जीवनात पुढे जाण्याची संधी मिळाली. शिवाजी गायकवाड यांनी बेवारस अवस्थेत आढळलेल्या नवजात बालकाचे प्राण वाचवून त्याला पोलिसांच्या आणि रुग्णालयाच्या स्वाधीन केले होते. त्यांच्या या माणुसकीच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला सुधर्मा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हेमंत बेलसरे, सचिव दिनकर बाविस्कर, नानाभाऊ चव्हाण, नितीन तायडे, भाग्यश्री नन्नवरे, सुवर्णा मराठे, विजया मराठे, सुनीता बेलसरे आणि सूर्यकांत हिवरकर उपस्थित होते. समाजातील गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे आणि निःस्वार्थ भावनेने समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे, हाच सुधर्मा संस्थेच्या कार्याचा मुख्य उद्देश असल्याचे संस्थेचे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

Drought Crisis: टंचाईच्या स्थितीतून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न ;शरद पवार यांचा दौरा सुरु

Latest Marathi News Update : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा तालुक्यात केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद

IND vs NZ ODI: टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया पुन्हा सज्ज! पहिला वनडे सामना कधी, कुठे अन् किती वाजता? लाईव्ह सामना टीव्ही मोबाईलवर कुठे पाहता येणार?

SCROLL FOR NEXT