बदलते पान
31826
नंदुरबार : ऊस पीक परिसंवादाप्रसंगी उपस्थित डॉ. रमेश हापसे, पद्माकर टापरे यांच्यासह शेतकरी.
----------------
शेल्टी येथे ऊस पीक परिसंवाद उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ९ : आयान मल्टीट्रेड एल.एल.पी.यांच्यातर्फे शेल्टीसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवाद कार्यक्रम झाला.
परिसंवादात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे यांनी ऊस पिकाच्या आधुनिक लागवड तंत्रज्ञानापासून पीक व्यवस्थापनापर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. योग्य वाणाची निवड, दर्जेदार बियाण्यांचा वापर, बेणे प्रक्रिया, लागवडीचे योग्य अंतर आणि पीक वाढीच्या अवस्थेनुसार खत व्यवस्थापन याची त्यांनी माहिती दिली. विविध कीड व रोगांची ओळख, नियंत्रण, कीटकनाशकांची निवड व फवारणीची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. पिकाला आवश्यकतेनुसार पाणी देणे, ठिबक सिंचनाचा वापर, पाण्याचे योग्य नियोजन आणि बचत करून ऊस उत्पादनात वाढ करण्याबाबत माहिती दिली.
कारखान्याचे व्यवस्थापक पद्माकर टापरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. ऊस वजन काट्याबाबत ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी कुठूनही वजन करून आणावे व शंकांचे निरसन करून घ्यावे. कुठलीही तफावत येणार नाही, याची खात्री दिली. यंदाच्या गळीत हंगामासाठी योग्य नियोजन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव व वेळेत पेमेंट देण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांना दिवाळीसाठी साखर देण्याची घोषणा केली.
यावेळी शेल्टी, नांदरखेडा व पळसवाडा परिसरातील शेतकरी उपस्थित होते. कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी श्री. पाटील, ऊस विकास अधिकारी श्री. माळी, उपमुख्य शेतकरी अधिकारी रमेश पाटील, ऊस पुरवठा अधिकारी नीलेश पाटील आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक अशोक पटेल यांनी सूत्रसंचालन तर ईश्वर पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.