niphad photo 1.jpg 
नाशिक

ऊसाचे उत्पादन लाखो टनाचे पण कारखाने......

सकाळवृत्तसेवा



नाशिक/ निफाड ः रानवड साखर कारखाना सुरू करा, रानवड साखर काराखाना व के. जी. एस. साखर कारखान्याचे शेतकरी व वाहतूकदार यांचे थकीत पेमेंट परत करा, यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष संघटनेतर्फे निफाड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी (ता. 6) ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करत संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. 



टोलवाटोलवी सुरूच

वडघुले यांनी 2019 मध्ये "रासाका' सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आली. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांनी लाल फितीच्या कारभारात या निविदा फाइल कधी मंत्रालय, तर साखर आयुक्तालय, अशी टोलवाटोलवी आजही सुरू ठेवली आहे. परिणामी कोट्यवधी रुपयांचा बोजा अप्रत्यक्षपणे संस्थेवर पडत आहे.

अन्यथा संघटनेतर्फे चक्काजाम 

 के. जी. एस. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांचे, कामगारांचे व वाहतूकदारांचे मोठ्या प्रमाणावर पैसे देणे बाकी असून, यासाठी 2018 मध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात आले होते. त्या वेळी साखर आयुक्तांनी "आरआरसी' कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. परंतु अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे ही रक्कम मिळणे गरजेचे आहे. जर या मागण्यांची दखल घेतली नाही, तर संघटनेतर्फे चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल अशा इशाराही दिला. 


सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती 
कामगार नेते बळवंत जाधव, नाना बच्छाव, तालुकाध्यक्ष संजय पाटोळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मोरे, सुधाकर मोगल, बळवंत जाधव, नितीन कोरडे, सुभाष गायकवाड, जगन्नाथ कडलग, शिवराम मोगल, संतोष पगारे, भास्कर शिंदे, निवृत्ती उगले, शरद चकोर, शांताराम उगले, सुनील दराडे, सीताराम सांगळे, पूंजाराम कडलग, त्र्यंबक चव्हाणके, अरुण कुशारे, दत्तू मोगल, भरत बांगर, नीलेश शिंदे, अनंत बर्वे, संतोष पवार, माधव संधान आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Donald Trump: भारताबाबत आक्षेपार्ह विधानानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना उपरती; 'महान देश' म्हणत केलं कौतुक...

Government Employees : शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तीव्र; चौथ्या दिवशीही कामकाज ठप्प, सुधारित पेन्शनसह १८ मागण्यांवर तोडगा नाही

Nanded Forest News: सागवानी लाकूड तस्करीवर जलधारा वनविकास महामंडळाची धडक कारवाई; टेम्पोसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटकेत

SCROLL FOR NEXT