SPPU sakal
नाशिक

SPPU: अमृत महोत्‍सवानिमित्त सुचवा पुणे विद्यापीठाला बोधचिन्‍ह; प्रवेशिका पाठविण्यासाठी 17 ऑगस्‍टपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

SPPU News : राष्ट्रीय स्‍तरावरील आघाडीच्‍या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये अमृत महोत्‍सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

अमृत महोत्‍सवी वर्षाचे बोधचिन्‍ह तयार केले जात असून, याकरिता बोधचिन्‍ह स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. या स्‍पर्धेत प्रवेशिका पाठविण्यासाठी १७ ऑगस्‍टपर्यंत मुदत दिलेली आहे. (Suggest badge to SPPU Pune University for Amrit Festival Deadline for submission of entries 17th August nashik)

पुणे विद्यापीठाचे अमृत महोत्‍सवी वर्ष साजरे केले जात असताना, विविध उपक्रम पार पडणार आहेत. अमृत महोत्‍सवी वर्षाचे बोधचिन्‍ह विकसित केले जाते आहे. त्यासाठी विद्यापीठातर्फे बोधचिन्‍ह स्‍पर्धेचे आयोजन केले आहे.

विद्यापीठाच्‍या अधिकार मंडळाच्‍या सूचनेनुसार ही बोधचिन्‍ह स्‍पर्धा सर्वांसाठी खुली असणार आहे. स्‍पर्धेतील प्रथम क्रमांकाच्‍या विजेत्‍यास ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. स्‍पर्धकांनी बोधचिन्‍ह पाठविण्याबाबत तांत्रिक माहिती विद्यापीठातर्फे उपलब्‍ध करून दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निर्धारित नमुन्यात बोधचिन्‍ह सादर करण्यासह त्‍यासंदर्भात शंभर शब्‍दांतील विश्‍लेषणदेखील सादर करायचे आहे.

एक किंवा एकापेक्षा जास्‍त स्‍तरावर समितीमार्फत प्राप्त बोधचिन्‍हांचे परीक्षण केले जाणार असून, यानंतर अंतिम स्पर्धकांची निवड केली जाणार आहे. ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्‍ही पद्धतीने प्रवेशिका सादर करून स्‍पर्धेत सहभागी होता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या अन् पेट्रोल टाकूनही जाळलं!

Horoscope 2026 : मेष ते मीन राशीपर्यंत..! 2026 वर्ष तुमच्यासाठी कसे असेल? वाचा नव्या वर्षाचं संपूर्ण वार्षिक राशिभविष्य

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

PCMC Election: अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक! पिंपरी-चिंचवडमध्ये तिसऱ्या पक्षाची एन्ट्री होणार? निवडणुकीसाठी नवा डाव टाकला

Solapur News : "पोलिसात दाखल गुन्ह्यातील सर्वाधिक गुन्हे हे दारूचे"- पो.नि.दत्तात्रय बोरीगिड्डे!

SCROLL FOR NEXT