death  esakal
नाशिक

Nashik News : शहरात आत्महत्त्यांचे सत्र सुरूच; वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आत्महत्त्येच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी (ता. १४) पुन्हा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी गळफास लावून घेत आत्महत्त्या केल्या आहेत. यात एक १७ वर्षीय मुलीचा समावेश आहे. (Suicide sessions continue in city Three hanged themselves in different incidents Nashik News)

सातपूरमधील स्वारबाबा नगरमधील धम्म चौकात राहणार्या वैजनाथ उत्तमराव शिंदे (३८) यांनी शुक्रवारी (ता. १४) रात्री आठ वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या शेडच्या बल्लीला साडीने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली.

उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्याने मयत घोषित केले. याप्रकरणी सातपूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना नाशिकरोड येथील कैलास लॉजमध्ये घडली.

अश्विन चंद्रकांत नानवटकर (२१, रा. त्रिमूर्तीनगर, भंडारा रोड, नागपूर) याने शुक्रवारी (ता. १४) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास लॉजमधील रुम नं. ४ मध्ये सिलिंगला स्कार्पने बांधून गळफास घेत आत्महत्त्या केली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तिसरी घटना आडगावात शिवारात घडली. संजना गोरख वाकळे (१७, रा. शाम व्हिला अपार्टमेंट, जत्रा हॉटेल, आडगाव शिवार) हिने राहत्या घरात साडीने पंख्याला बांधून गळफास लावून घेतला.

उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता तपासून मयत घोषित करण्यात आले. याप्रकरणी आडगाव पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT