Sula Vineyards sakal
नाशिक

Nashik Sula Vineyards : सुला वाइनचे जागतिक यश! डिकॅंटर २०२५ मध्ये चार वाइनना रौप्यपदक

Sula Vineyards Shines at Decanter World Wine Awards : सुला वाइनयार्ड्सच्या चार व्हाइट वाइनना डिकॅंटर वर्ल्ड वाइन ॲवॉर्ड्स २०२५ मध्ये रौप्यपदक मिळाल्याने नाशिक व भारताच्या वाइन उद्योगाचा सन्मान जागतिक स्तरावर वाढला आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक- देशातील आघाडीची वाइन उत्‍पादक कंपनी असलेल्‍या सुला विनियार्डसने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर भारतीय वाइनचे नाव उंचावले आहे. जगातील सर्वांत मोठ्या तसेच प्रतिष्ठेच्‍या डिकॅंटर वर्ल्ड वाइन ॲवॉर्ड्‍‍स २०२५ मध्ये ‘सुला’च्या चार वाइनना रौप्‍यपदक मिळाले आहे.

‘सुला’च्या ‘द सोर्स शेनिन ब्लाँक रिझर्व्ह’, ‘द सोर्स सॉव्हिन्यॉन ब्लाँक रिझर्व्ह’, ‘दिंडोरी रिझर्व्ह शार्डोने’ आणि ‘दिंडोरी रिझर्व्ह वियोनिए’ या पुरस्कारप्राप्त व्हाइट वाइन त्यांच्या उत्कृष्ट चव, समतोल आणि भारतीय जमिनीच्या खास गुणधर्मासाठी ओळखल्या गेल्या. त्या भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रिय ठरल्या आहेत.

‘सुला’चे सीओओ आणि चीफ वाइनमेकर गोरख गायकवाड म्हणाले, की डिकॅंटर वर्ल्ड वाइन ॲवॉर्ड्‍‍समध्ये सन्मान मिळणे संपूर्ण टीमसाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक पुरस्कार आमच्या मेहनतीची, प्रयोगशील कामगिरीची साक्ष आहे. भारतीय जमिनीतून उत्तम वाइन तयार होऊ शकते, या आमच्या विश्वासावर पुरस्कारातून जागतिक शिक्कामोर्तब झाले आहे.

द सोर्स रिझर्व्ह शेनिन ब्लाँक ही उष्णकटिबंधीय फळांची चव देणारी वाइन असून, द सोर्स सॉव्हिन्यॉन ब्लाँक रिझर्व्ह त्याच्या अर्थपूर्ण आणि संतुलित चवीसाठी ओळखली जाते. दिंडोरी रिझर्व्ह शार्डोने ही वाइन हलक्‍या ओक फ्लेवरसह उत्तम संतुलनासाठी प्रसिद्ध आहे. दिंडोरी रिझर्व्ह वियोनिएची ओळख समृद्ध, सुगंधी आणि रसाळ आहे. डिकॅंटर २०२५ मधील या यशाने केवळ ‘सुला’चाच नव्‍हे, तर संपूर्ण भारतीय वाइन उद्योगाचा जागतिक सन्मान वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: 'आमा'चा जन्म भारतात.. त्यांना महिन्याला पैसे पाठवत होतो; गुहेतील महिलेच्या नवऱ्याचा दावा, कोण आहे ड्रोर गोल्डस्टीन?

Dindori Accident : मोटारसायकलला धडकताच नाल्यात कोसळली कार, बालकासह 7 जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Viral Video: बापरे...! अचानक पीएमटी बसचा ब्रेक झाला फेल, पुढे काय झाले पाहा

व्याख्या, विख्खी, वुख्खू! 'धूमधडाका'मधील धनाजीराव वाकडेंचं घरं कुठेय माहितेय का? घराची अवस्था पाहून तुम्हालाही धक्का बसेल

मोठी बातमी! 'बंगळूर चेंगराचेंगरीला RCB च जबाबदार', Virat Kohli चा व्हिडिओही अहवालात; कर्नाटक सरकारनं ठरवलं दोषी

SCROLL FOR NEXT