Sula Vineyards esakal
नाशिक

Sula Vineyards : सुला विनयार्डसला आर्थिक वर्ष लाभदायी! प्रीमियम उत्पन्नात 30 टक्के वाढ

सकाळ वृत्तसेवा

Sula Vineyards : सुला विनयार्ड्ससाठी चौथे त्रैमासिक आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ विक्रमी ठरले आहे. या वर्षामध्ये स्वतःच्या ब्रॅन्डच्या दहा लाख वाइन केसेसची विक्री केली. प्रीमिअम वाइनच्या उत्पन्नात ३० टक्क्यांनी वार्षिक वाढ झाली आहे. (Sula Vineyards profitable financial year 30 percent increase in premium income nashik news)

शेअर मार्केटमध्ये नोंदणीकृत ‘सुला’ ही देशातील एकमेव कंपनी आहे. देशातील ‘एलिट’ आणि ‘प्रीमिअम’ व्यवसायात ६० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. ‘सुला'ने स्वतःच्या ब्रॅन्डच्या विक्रीमध्ये नवीन वार्षिक विक्रम प्रस्थापित केला.

चौथ्या त्रैमासिकात गेल्या वर्षाच्या तुलनेत १५ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत २६ टक्के वाढ झाली. ‘वाइन टुरिझम’च्या कमाईमध्ये ‘सुला’ने नवीन वार्षिक विक्रम गाठला. आतापर्यंतचा सर्वोच्च वार्षिक महसूल नोंदवला.

चौथ्या त्रैमासिकात गेल्या वर्षाच्या तुलनेत ३० टक्के आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत १८ टक्के वाढ झाली. ‘एलिट’ आणि ‘प्रीमिअम’ वाइनच्या विक्रीने पहिल्यांदाच पाच लाख केसेसचा पल्ला ओलांडला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

स्वतःच्या ब्रॅन्डवर लक्ष केंद्रित

‘सुला’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव सामंत म्हणाले, की ‘सुला’च्या २३ वर्षांच्या प्रवासातील आर्थिक वर्ष २०२२-२३ हे सर्वांत महत्त्वाचे आणि अत्यंत यशस्वी वर्षांपैकी एक आहे. ‘प्रीमियमायझेशन'वर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आम्हाला खूप फायदा होत आहे.

दहा लाख वाइन केसेस पैकी ५२ टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा सुला विनयार्ड्स, रासा आणि द सोर्स या ब्रॅन्डचा आहे. कोरोनापूर्व काळात आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये हा वाटा फक्त ४६ टक्के होता.

आम्ही फायदेशीर आमच्या स्वतःच्या ब्रॅन्ड्सवर आमचे लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवले आहे. ‘टेस्टिंग' विभागात एक लाख ३० हजारांहून अधिक लोकांनी अनुभूति घेतली. ‘टेस्टिंग' विभागावर लक्ष केंद्रित ठेवणे हे कंपनीचे ध्येय राहिले आहे.

"सुला विनयार्डस् च्या वाइन पर्यटन व्यवसायात नियमित वाढ होत आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या एकूण कमाईने ८० कोटींचा पल्ला गाठला. २०१८-१९ मध्ये तो ४४ कोटी होता. येत्या वर्षात हा व्यवसाय १०० कोटींचा आकडा पार करेल, अशी आमची अपेक्षा आहे. भारतामध्ये लोकांचा वाइनकडे कल वाढतो आहे. अधिक प्रीमियम वाइनचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्या अनुषंगाने ते ‘सुला’कडे वळत आहेत."

- राजीव सामंत (मुख्य कार्यकारी अधिकारी, सुला विनयार्डस्)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT