Crowd of customers at the Kulfi selling cart on Camp Road in Malegaon esakal
नाशिक

Summer Business: कुल्फी, शीतपेय विक्रेत्यांचा व्यवसाय जोमात! तापमान वाढल्याने असंख्य व्यावसायिकांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

Summer Business : कसमादे परिसरात गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले होते. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले होते. मे महिन्याच्या प्रारंभी गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढल्याने शहर व ग्रामीण भागातील जनजीवनावर परिणाम झाला आहे.

वाढत्या तापमानाचा फटका बसत असला तरी हंगामात अखेरच्या टप्प्यात का होईना तापमान वाढल्याने कुल्फी, शीतपेय, आइस्क्रीम, लस्सी, बर्फगोळे, सरबत, लिंबू शिखंजी, मसाले ताक विक्री करणाऱ्या असंख्य व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. (Summer Business Kulfi soft drink sellers business booming Many professionals relieved temperature rises nashik news)

उन्हाळ्याच्या पाश्‍र्वभूमीवर शेकडो तरुण चारचाकी हातगाडीच्या माध्यमातून हंगामी व्यवसाय करतात. उकाड्याने त्रस्त नागरीक जिवाची काहीली शमविण्यासाठी थंडपेयांचा आधार घेतात. शहरासह ग्रामीण भागात रसवंती जोरात सुरु झाल्या आहेत.

प्रत्येक लग्न समारंभाबाहेर मंगल कार्यालय, लॉन्स आदी ठिकाणी कुल्फी, आइस्क्रीम यासह विविध शीतपेये विक्रेत्यांच्या गाड्यांची संख्या वाढली आहे. शहरातील तापमानाचा पारा यापुर्वीच ४२ अंश सेल्सिअसवर पोचला आहे.

गेल्या चार दिवसापासून तापमान ४१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याने दुपारच्या सुमारास बाजारपेठेतील गर्दी मंदावली आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा वऱ्हाडी मंडळींना बसत असल्याने विवाहसोहळ्यात पंखे, कुलर आदींची प्रामुख्याने गरज भासू लागली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ताक, मठ्ठा मागणीत वाढ

तापमानामुळे विवाहसमारंभात ताक, मठ्ठा भोजनातील अविभाज्य घटक झाला आहे. दही, तूप, ताक, लोणी आदींची विक्री वाढली असली तरी तालुक्यातील दुध संकलनात घट झाली आहे. उन्हामुळे दुभत्या जनावरांचे दुध देण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

पशुधनाचा सांभाळही शेतकऱ्यांना जिकरीचा झाला आहे. ग्रामीण भागात गोठ्यांमध्ये दुभत्या जनावरांची काळजी घेण्यासाठी ओले बारदान, स्प्रिंकलरद्वारे पाणी मारून गोठा थंड ठेवला जात आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची बाजारपेठ वधारली

येथील इलेक्ट्रॉनिक्स विक्रेत्यांचा या आठवड्यापासून व्यवसाय हळूहळू वधारू लागला मालेगाव इलेक्ट्रॉनिक्सचे जवाहर नानावटी यांनी सांगितले. फ्रीज, कुलर, एसी, पंखे आदी वस्तुंची मागणी वाढू लागली आहे. तसेच ही साधने दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांनाही फ्रिज, कुलर दुरुस्तीचे कामे मिळू लागली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake FASTag Annual Pass : सावधान! बनावट ‘फास्टॅग वार्षिक पास’ने सुरू आहे फसवणूक; ‘NHAI’ने दिला इशारा

कधी सुरू झाली कधी संपली कळलंच नाही! ३ महिन्यात स्टार प्रवाहची मालिका ऑफ एअर; 'या' दिवशी असणार शेवटचा भाग

VIRAL VIDEO: “गलत करते हो यार…” रोहित शर्मा संतापला; चिमुकलीच्या सुरक्षिततेसाठी पुढे सरसावला, मुंबई विमानतळावर काय घडलं?

राम कपूर अन् साक्षी तंवर यांचा 'तो' बोल्ड सीन; पत्नी गौतमीला कानोकान नव्हती खबर, रात्री समजलं तेव्हा...

Latest Marathi News Live Update: वार्ड क्रमांक ३४ मधील अपक्ष उमेदवार अरबाज अस्लम शेख यांच्यावर हल्ला

SCROLL FOR NEXT