Youths enjoying a leisurely swim in the summer heat esakal
नाशिक

Summer Season : वर्तमानाचे ऊन अन आठवणींचा गारवा! चांदोरीत पोहण्याचा आगळा वेगळा सोहळा

सागर आहेर

Summer Season : चांदोरी हे गाव गोदाकाठी वसलेलं, बाराही महिने नदीला पाणी असलेले... पूर्वी उन्हाळा म्हटलं की चांदोरीची मुलं सकाळ संध्याकाळ नदीवर दिसायची.

उन्हापासून वाचण्यासाठी दिवसातून किमान ३ वेळा नदीवर पोहणं व्हायचं, नंतर नदीवर भेळभत्त्यावर ताव मारला जायचा, घरचे लोक पोरगा कुठे गेला या भीतीने नदीवर धावत यायचे आणि बराच वेळा मुलांना फटके बसायचे. मुले नदीवर अंघोळ करून आले की नाही हे त्या काळात मुलांच्या ओल्या करदोड्यावरून ओळखले जायचे. (Summer Season chill of memories Swimming in Chandori another different ceremony nashik news)

पण काळ बदलला आणि हे सगळं थांबले. नदीवर उन्हाळ्यात कुणी अंघोळीला येईनासे झाले. हे बघून चांदोरीचे भूषण मटकरी यांनी संवगड्यांना घेत एकदिवस पोहण्याचा कार्यक्रम करायला काय हरकत आहे असे सांगून पाहिले.

त्यानिमित्त नवीन पिढी पोहायला शिकेल आणि गावातून बाहेर गेलेली जुनी मंडळी पोहण्याच्या निमित्ताने गावात येतील. या संकल्पनेनुसार गेल्या सात वर्षांपासून चांदोरी गावामध्ये एप्रिल मे महिन्यात पोहण्याचा एक कार्यक्रम ठेवण्यात येतो.

यासाठी नोकरीनिमित्त बाहेरगावी असणाऱ्या मुंबई, पुणे, नगर आदी ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या सगळ्या चांदोरीकरांना आमंत्रण धाडण्यात येतात आणि एप्रिल महिन्यातल्या रविवारी (ता.२३) हा कार्यक्रम सकाळी ८ ते ११ या वेळेत पार पडला गेला.

यावर्षी भूषण मटकरी, योगेश सोनवणे, अमेय वनारसे, विलास सूर्यवंशी, वसंत टर्ले, ज्ञानेश्वर गडाख, रिझवान इनामदार, सार्थक मटकरी, प्रमोद मटकरी, मुक्तार इनामदार, भैया इनामदार, अर्शद इनामदार, नंदू नाठे, चेतन वनारसे, विराज वनारसे, बबलू रोकडे, वैभव मेतकर, डॉ. संजय आहेर, ज्ञानेश्वर टर्ले, सागर गडाख, विलास राजेंद्र वायकांडे आदी उपस्थित होते.

पोहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांनी चहा घेत तर्रीदार मिसळीवर ताव मारला. या उपक्रमामुळे चांदोरीमधील पोहण्याची परंपरा चालू असण्याबरोबरच नवीन पिढीतील मुलांना ही पोहण्यास शिकविले जात आहे.

"१९७० व त्यानंतर गावात नदीवर पोहायला जायचो, शरीर नेहमीच फिट असायचे परंतु नोकरीनिमित्त मुंबईस्थित झालो अन गावाच्या या आठवणीनं मुकलो, परंतु या निमित्ताने खास चांदोरीत येऊन जुन्या आठवणींना उजाळा मिळाला."- नंदू नाठे, मुंबई.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT